केंद्र सरकारचा फास्टॅगबाबत वाहनचालकांना दिलासा, 15 फेब्रुवारीपर्यंत वाढवली मुदत..!

| मुंबई | केंद्र सरकारने फास्टॅगबाबत वाहनचालकांना काहीसा दिलासा दिला आहे. आता 15 फेब्रुवारीपर्यंत वाहनांमध्ये फास्टॅग लावता येऊ शकतं. रस्ते पहिवहन मंत्रालयाने राष्ट्रीय महामार्गांवर टोल वसुली फास्टॅगद्वारे अनिवार्य करण्याची मुदत वाढवली आहे. केंद्र सरकारने टोलनाक्यावर टोल वसुली सोपी आणि सुरक्षित बनवण्यासोबतच वाहतूक कोंडीतू मुक्तता व्हावी यासाठी चारचाकी वाहनांनासाठी 1 जानेवारीपासून फास्टॅग अनिवार्य केलं होतं. परंतु वाहचनालकांना फास्टॅग मिळण्यात येणाऱ्या अडचणी पाहता केंद्र सरकारने 15 फेब्रुवारीपर्यंत मुदत वाढवली आहे.

भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने घोषणा केली होती की, “1 जानेवारी 2021 पासून देशाचे सर्व राष्ट्रीय मार्गांवरील टोलनाके कॅशऐवजी फास्टॅग लेनमध्ये रुपांतरीत होती. जर एखादा वाहनचालक फास्टॅगशिवाय टोलनाक्यावर आला तर त्याला दुप्पट टोल द्यावा लागेल.” परंतु आता फास्टॅग घेण्यासाठी आणि लावण्यासाठी वाहनचालकांना दीड महिन्यांची मुदत मिळाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *