| मुंबई | कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या मराठवाड्यातील दोन पत्रकारांच्या कुटुंबियांना सरकारने घोषणा केल्याप्रमाणे पन्नास लाख रुपये विमा संरक्षण अंतर्गत मदत करावी, अशी मागणी सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि आरोग्य मंत्र्यांकडे लेखी पत्राद्वारे केली आहे.
मंत्री धनंजय मुंडे यांनी मयत पत्रकारांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत करण्याबाबत पत्रकार संघाच्या निवेदनाची तात्काळ दखल घेऊन सकारात्मक भूमिका घेतल्याबद्दल राज्यभरातील पत्रकारांमधून समाधान व्यक्त होत आहे.
बीड जिल्ह्यातील गेवराई येथील पत्रकार संतोष भोसले (वय ४८) यांचा २८ जुलै रोजी जिल्हा रुग्णालयातील कोविड कक्षात उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर लातूर येथील ज्येष्ठ पत्रकार गंगाधर सोमवंशी (वय ६१) यांचाही कोरोनाची बाधा झाल्याने सरकारी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. दोन्ही पत्रकारांची कौटुंबिक परिस्थिती जेमतेम असून महाविकास आघाडी सरकारने घोषणा केल्याप्रमाणे कोरोना काळात कर्तव्यावर असताना पत्रकाराचा कोरोनाबाधित होऊन मृत्यू झाला तर कुटुंबियांना विमा संरक्षण अंतर्गत पन्नास लक्ष रुपयांची मदत देण्याची घोषणा केली होती. दोन्ही पत्रकारांचा मृत्यू कोरोना कक्षात उपचार सुरू असताना झाल्यामुळे सरकारने घोषणेनुसार त्यांना मदत करावी अशी मागणी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे यांनी एका निवेदनाद्वारे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे केली होती.
याची तात्काळ दखल घेऊन मंत्री श्री. मुंडे यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आरोग्य मंत्री राजेश टोपे यांना सरकारने घोषणा केल्यानुसार मयत पत्रकारांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत करावी असे पत्र दिले आहे. मंत्री धनंजय मुंडे यांनी पत्रकारांच्या मागणीवर सकारात्मक भूमिका घेतल्याबद्दल राज्यभरातील पत्रकारांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.
- जळगावात तरुणीची अत्याचार करून हत्या
- तिहेरी हत्याकांडाने हादरला रायगड जिल्हा…एकाच कुटुंबातील तिघांची निर्घृण हत्या
7 महिन्याच्या गर्भवती महिलेच्या हत्येने हुतात्म्यांची भूमी सुन्न.. - महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना ठाणे महापालिका जिल्हा कार्यकारिणी स्थापन
राज्य कोषाध्यक्ष श्री अरुण बडे आणि ठाणे जिल्ह्या अध्यक्ष अरुण कराळे यांच्या निरीक्षणात पार पडली सभा - मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील सी.सी टीव्हीसाठीचे मध्यवर्ती शाळा नियंत्रण कक्षाचे दूरदूरश्यप्रणालीद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण संपन्न
*मिरा-भाईंदर महानगरपालिकेचे अनुकरण इतर महानगरपालिकांनीही करावे – मुख्यमंत्री - कार्यसम्राट दमदार आमदार महेंद्रशेठ थोरवे ६०००० च्या मताधिक्याने विधानसभेवर जाणार…पालकमंत्री उदयजी सामंत यांचे प्रतिपादन .
महाआघाडी सह मनसेलाही खिंडार…आमदार थोरवेंचा जलवा कायम .