#कोरोना व्हायरस MH : आजची सद्यस्थिती; ११ हजार ८८ नवे रुग्ण तर १० हजार १४ कोरोना मुक्त

| मुंबई | आज दिवसभरात राज्यात 11 हजार 88 नव्या कोरोना रुग्णांची वाढ झाली आहे. तर 24 तासात 256 जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यात कोरोना रुग्ण बरे होण्याचं प्रमाण वाढत असून आज महाराष्ट्रात 10 हजार 14 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

राज्यात एकूण कोरोनाबाधितांची संख्या 5 लाख 35 हजार 601 इतकी झाली आहे. त्यापैकी एकूण 3 लाख 68 हजार 435 कोरोनाग्रस्त बरे झाले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचं प्रमाण-रिकव्हरी रेट 68.79 टक्के एवढा झाला आहे.

सध्या राज्यात 1 लाख 48 हजार 553 ऍक्टिव्ह रुग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. तर आतापर्यंत 18 हजार 306 जणांचा बळी गेला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर 3.42 टक्के इतका आहे.

सध्या राज्यात 10 लाख 4 हजार 233 जण होम क्वारंटाईनमध्ये असून 35 हजार 648 जण संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आतापर्यंत 28 लाखांहून अधिक चाचण्या झाल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *