कल्याण डोंबिवली मनपाच्या कोविड टेस्टिंग लॅब वरून राजकारण मनसेच्या आमदाराचा दावा खोटा..?

| कल्याण | काल मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या हस्ते आणि पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विशेष उपस्थितीत कोविड सेंटर, कोविड टेस्टिंग लॅब सह इतर महत्वपूर्ण प्रकल्पांचा शुभारंभ झाला. दरम्यान या प्रकल्पांसाठी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी विशेष मेहनत घेतली.

दरम्यान , यातील कोविड सेंटर व टेस्टिंग लॅब वरून मात्र आता राजकारण सुरू झालेले दिसून येत आहे. यासाठी आपण स्वतः पहिल्यापासून पाठपुरावा केला आणि त्यामुळे हे घडले, मी माझ्या निधीतून काही लाख रुपये रक्कम जिल्हाधिकारी यांच्याकडे उपलब्ध केले आहेत, असे स्थानिक मनसेचे आमदार यांनी दावा केला आहे, यावरून आता शिवसेना आणि मनसे कार्यकर्त्यांमध्ये कलगीतुरा रंगला आहे.

दरम्यान, उपलब्ध माहितीनुसार गौरीपाडा येथील टेस्टिंग लॅबची इमारत ही झोजवाला विकासक ह्यांच्याकडून PPP तत्वावर कल्याण डोंबिवली महापालिकेने बांधून घेतली असून क्रॅशना डायग्नोस्टिक ह्यांच्या व कल्याण डोंबिवली महापालिकेच्या संयुक्त विद्यमाने ते सुरू करण्यात आलेली आहे. त्यामुळे त्या सेंटरला जिल्हाधिकारी साहेबांचा निधी असण्याचे तसे कोणतेही कारण नाही, असे समजत आहे. त्यामुळे मनसेच्या आमदारांचा दावा उघडा पडला असल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे.

त्यामुळे सोशल मीडियाच्या माध्यमातून सुजाण नागरिकांकडून देखील या बाबत प्रतिक्रिया येत आहेत. सवयीनुसार दुसऱ्याचे श्रेय लाटणे हा आमदार यांचा नित्य कार्यक्रमच झालाय. खासदार यांनी एखादी योजना किंवा काम पाठपुरावा करून ते तडीस न्यायचे आणि आमदारांनी आयत्या बिळावर नागोबा म्हणून बसायचे हे नित्याचेच झाले आहे, अश्या स्वरूपाच्या सामान्य लोकांच्या प्रतिक्रिया सोशल मीडियाच्या माध्यमातून उमटताना दिसत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *