कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघाच्या दौंड तालुका अध्यक्षपदी आप्पा जगताप; तर महासचिवपदी हौशीराम गायकवाड यांची निवड.

| दौंड / महादेव बंडगर | महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघाच्या दौंड तालुका अध्यक्षपदी आप्पा जगताप यांची निवड करण्यात आली आहे तर महासचिवपदी हौशीराम गायकवाड यांची निवड करण्यात आली आहे. तसेच उपाध्यक्षपदी दुर्योधन चव्हाण, कोषाध्यक्षपदी राजेंद्र गायकवाड यांची निवड करण्यात आल्याची अधिकृत घोषणा कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघाच्या शिक्षक आघाडीचे राज्य महासचिव गौतम कांबळे यांनी केली.

अध्यक्षपदी निवड झालेले श्री आप्पा जगताप हे कानगाव येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये मुख्याध्यापक म्हणून कार्यरत असून महासचिव पदी निवड झालेले हौशीराम गायकवाड हे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बंगलवस्ती (रावणगाव) शाळेमध्ये मुख्याध्यापक म्हणून कार्यरत आहेत. श्री गायकवाड हे उपक्रमशील, तंत्रस्नेही, संगणक क्षेत्रामध्ये प्राविण्य असलेले शिक्षक असून बंगलवस्ती शाळेमध्ये वेगवेगळे उपक्रम राबविण्यामध्ये ते नेहमीच अग्रेसर असतात.

अध्यक्ष व महासचिव पदी निवड झाल्यानंतर दौंड तालुक्यातील सर्वसामान्य प्राथमिक शिक्षक केंद्रबिंदू मानून त्यांच्या अडी अडचणी सोडवण्यासाठी आपण कार्यरत राहणार असल्याचे श्री. जगताप व गायकवाड यांनी सांगितले. निवडीबद्दल नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे सर्वच स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *