कोवाक्सिन (COVAXIN) ही लस पाण्याच्या बॉटेलपेक्षाही कमी किंमतीत देण्याचा मानस

| मुंबई | जगभरात कोरोनाने थैमान घातले आहे. दिवसेंदिवस कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत आहे. दुसरीकडे जगभरातील सर्वच देश कोरोनावर लस शोधण्याच्या प्रयत्नात आहे. भारतातही यात मागे नाही आहे. भारतात कोरोनाची लस तयार करण्याचं काम भारत बायोटेक या कंपनीकडून सुरू आहे. भारत बायोटेकच्या वतीने कोवाक्सिन (COVAXIN) ही लस तयार केली जाणार आहे. ही लस सध्या मानवी चाचणीच्या पहिल्या टप्प्यात आहे. या चाचणीचा दुसरा टप्पा सप्टेंबरपासून सुरू होण्याची शक्यता आहे. दरम्यान ही लस पाण्याच्या बॉटेलपेक्षाही कमी किंमतीत देण्याचे आमचे मानस असल्याचे भारत बायोटेक कंपनीच्या वतीने सांगण्यात आले आहे.

तेलंगणाचे मंत्री के तारका यांनी भारत बायोटेक कंपनीला भेट दिली. यावेळी त्यांनी कोरोना लशीच्या प्रगतीबाबत चर्चा केली. यावेळी कंपनीचे संचालक कृष्णा एला यांनी, कोरोनाशी लढण्यासाठी आम्ही तयार आहोत. जागतिक आरोग्य संघटना कोवाक्सिनला पाठिंबा देत आहे. ही लस कमीत कमी किंमतीत लोकांपर्यंत पोहचवावी, हे आमचे उद्दिष्ट असल्याचेही यावेळी कृष्णा एला म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published.