
| नवी दिल्ली | पुढील काही दिवसांमध्ये देशात खासगी रेल्वे सुरू होणार आहेत. परंतु त्या ट्रेननं प्रवास करणं थोडं महाग पडण्याची शक्यता आहे. दरम्यान, विमान कंपन्यांच्या धर्तीवर खासगी ट्रेननादेखील आपल्या तिकिटांचे दर निश्चित करता येणार आहेत. ब्लूमबर्गच्या रिपोर्टनुसार देशात खासगी रेल्वेसेवा सुरू झाल्यानंतर सरकार त्या ट्रेन चालवणा-या कंपन्यांना या प्रकारची सूट देण्याची तयारी करत आहे.
खासगी कंपन्यांच्या रेल्वे गाड्यांना त्यांच्या तिकिटाचे दर निश्चित करण्याची परवानगी देण्यात आली असल्याची माहिती भारत रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष व्ही.के.यादव यांनी सांगितलं. परंतु त्या मार्गावर एसी बसेस किंवा विमानांची सुविधा असेल तर तिकिटाचे दर निश्चित करण्यापूर्वी ही बाब ध्यानात ठेवावी लागणार आहे.
एल्सटॉम, बॉम्बार्डियर इंक, जीएमआर इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड आणि अदानी एन्टरप्राइजेज लिमिटेड या कंपन्यांनी या योजनेमध्ये रस दाखवला आहे. या योजना पुढील पाच वर्षांमध्ये ७.५ अब्ज डॉलर्सपर्यंतचीही गुंतवणूक आणू शकतात, असं रेल्वे मंत्रालयाचं मत आहे. तर दुसरीकडे रेल्वेनं नवी दिल्ली आणि मुंबईसहित रेल्वे स्थानकांच्या आधुनिकीकरणासाठीही गुंतवणुकदारांना निमंत्रित केलं आहे.
२०२३ पर्यंत देशातील पहिली बुलेट ट्रेन चालवण्यासाठी जपानकडून कमी दरात केंद्र सरकारनं कर्ज घेतलं आहे. तर दुसरीकडे विद्यमान रेल्वे सेवांचं आधुनिकीकरण होणं आवश्यक आहे. सरकारनं प्रवासी रेल्वे ट्रेनची गती वाढवण्यासाठीही आवश्यक ती पावलं उचलण्यात येत आहेत.
– रेल्वे मंत्रालय
- आधी संपलेला पक्ष अशी टीका, आता युतीसाठी विनवण्या – एकनाथ शिंदे
एकनाथ शिंदे यांची उद्धव ठाकरेंवर बोचरी टीका - जळगावात तरुणीची अत्याचार करून हत्या
- तिहेरी हत्याकांडाने हादरला रायगड जिल्हा…एकाच कुटुंबातील तिघांची निर्घृण हत्या
7 महिन्याच्या गर्भवती महिलेच्या हत्येने हुतात्म्यांची भूमी सुन्न.. - महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना ठाणे महापालिका जिल्हा कार्यकारिणी स्थापन
राज्य कोषाध्यक्ष श्री अरुण बडे आणि ठाणे जिल्ह्या अध्यक्ष अरुण कराळे यांच्या निरीक्षणात पार पडली सभा - मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील सी.सी टीव्हीसाठीचे मध्यवर्ती शाळा नियंत्रण कक्षाचे दूरदूरश्यप्रणालीद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण संपन्न
*मिरा-भाईंदर महानगरपालिकेचे अनुकरण इतर महानगरपालिकांनीही करावे – मुख्यमंत्री