| मुंबई | भारतात मोबाइल प्रोडक्शन करणाऱ्या काही कंपन्या आहेत, पण मोबाइल पार्ट्स अजूनही बाहेरुनच मागवावे लागतात. ही समस्याही आता लवकरच सुटण्याची शक्यता आहे. टाटा समूहाची कंपनी टाटा सन्स आता देशातच मोबाइलचे पार्ट्स बनवण्याच्या तयारीत आहे.
काही मीडिया रिपोर्ट्सनुसार, भारतातच मोबाइलचे पार्ट्स बनवण्यासाठी टाटा सन्स तामिळनाडूमध्ये मोठा प्रकल्प उभारणार आहे. या योजनेत टाटा समूह तब्बल 1.5 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार आहे. तर, टाटा समूह या योजनेसाठी 1.5 अब्ज डॉलर्सचे कर्ज घेणार असल्याचंही एका मीडिया रिपोर्टमध्ये म्हटलं आहे. यातील 75 कोटी डॉलर्स ते एक अब्ज डॉलर्सपर्यंतची रक्कम कंपनी एक्स्टर्नल कमर्शियल बॉरोईंगद्वारे (ECB) जमवणार आहे.
नव्या प्रकल्पासाठी कंपनी सीईओच्या शोधात असून टाटाच्या या नव्या प्रकल्पात सर्वप्रथम आयफोनचे पार्ट्स बनवले जातील असं सांगितलं जात आहे. दरम्यान, भारतीय मार्केटमध्ये दर्जेदार मेड इन इंडिया स्मार्टफोन उपलब्ध नसल्याने चिनी कंपन्यांची देशात मक्तेदारी वाढल्याचं बोललं जातं. जर, भारत या क्षेत्रात आत्मनिर्भर झाला तर त्याचा देशाला फायदा होईलच सोबतच चीनलाही मोठा फटका बसेल अशी शक्यता वर्तवली जात आहे.
- जळगावात तरुणीची अत्याचार करून हत्या
- तिहेरी हत्याकांडाने हादरला रायगड जिल्हा…एकाच कुटुंबातील तिघांची निर्घृण हत्या
7 महिन्याच्या गर्भवती महिलेच्या हत्येने हुतात्म्यांची भूमी सुन्न.. - महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना ठाणे महापालिका जिल्हा कार्यकारिणी स्थापन
राज्य कोषाध्यक्ष श्री अरुण बडे आणि ठाणे जिल्ह्या अध्यक्ष अरुण कराळे यांच्या निरीक्षणात पार पडली सभा - मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील सी.सी टीव्हीसाठीचे मध्यवर्ती शाळा नियंत्रण कक्षाचे दूरदूरश्यप्रणालीद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण संपन्न
*मिरा-भाईंदर महानगरपालिकेचे अनुकरण इतर महानगरपालिकांनीही करावे – मुख्यमंत्री - कार्यसम्राट दमदार आमदार महेंद्रशेठ थोरवे ६०००० च्या मताधिक्याने विधानसभेवर जाणार…पालकमंत्री उदयजी सामंत यांचे प्रतिपादन .
महाआघाडी सह मनसेलाही खिंडार…आमदार थोरवेंचा जलवा कायम .