खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांच्या पुढाकाराने सांस्कृतिक नगरी डोंबिवलीत होणार वैद्यकीय क्रांती..!

| डोंबिवली | हजारो गरीब रुग्णांसाठी वरदान ठरलेल्या कल्याण डोंबिवली महापालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयात खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या पाठपुराव्यामुळे आणि संकल्पनेतून एमआरआय, पथोलॉजी, रेडिओलॉजी, सिटी स्कॅन आदी सारख्या अद्यावत सुविधा सुरू होणार आहेत. अत्यंत अद्ययावत अशा या वैद्यकीय उपकरणांमुळे रोगनिदानाची अचूकता वाढणार आहे. तसेच, या महागड्या वैद्यकीय सेवा गरीब रुग्णांना अत्यल्प दरात मिळणार आहेत.

पीपीपी तत्त्वावर एमआरआय, रेडिओलॉजी, पथोलॉजी आणि सिटी स्कॅन सुविधा उपलब्ध होणार असून कृष्णा डायग्नोस्टिक सेंटर देखील या संकल्प पूर्तीचा भाग असणार आहे. तब्बल अनेक वर्षांपासून डोंबिवलीतील नागरिकांच्या सेवेत असलेल्या या रुग्णालयात विविध उपचारांच्या सोयी आहेत. परंतु येथे एमआरआय आणि सिटी स्कॅन सुविधा उपलब्ध नसल्यामुळे रुग्णांची परवड होत होती. त्यांना खासगी रुग्णालयात महागड्या दराने ही सेवा घ्यावी लागत होती किंवा ठाणे, मुंबईपर्यंत धाव घ्यावी लागत होती.

त्यामुळे रुग्णांची ही अडचण दूर करण्यासाठी खा. डॉ. शिंदे प्रयत्नशील होते. पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि आयुक्त यांच्याशी चर्चा करून येथे पीपीपी तत्त्वावर ही सेवा सुरू करण्याची मागणी सातत्याने त्यांनी केली होती. त्यानुसार आता ही सेवा कल्याण डोंबिवलीकरांना उपलब्ध होणार आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानाची ही उपकरणे असून अशा प्रकारची कल्याण डोंबिवलीतील पहिलीच उपकरणे असणार आहेत. शासनाने ठरवून दिलेल्या अत्यल्प शुल्क आकारणीत रुग्णांना ही सेवा उपलब्ध होणार आहे.

खासदार डॉ श्रीकांत शिंदे स्वतः डॉक्टर असल्याने त्यांनी आपल्या लोकसभा मतदारसंघात आरोग्याचा स्तर उंचावण्यासाठी नेहमीच प्रयत्न केला आहे. २०१७ मध्ये ठाण्यातील कळवा हॉस्पिटल मध्ये देखील अश्या प्रकारच्या अत्याधुनिक सुविधा त्यांनी उभारल्या असून त्याचा फायदा लाखो सामान्य नागरिकांना होत आहे. आता डोंबिवलीतील या सुविधेमुळे या क्षेत्रातील नागरिकांना या सुविधा उपलब्ध होणार आहेत. गेल्या १०-१२ वर्षात डोंबिवलीत आरोग्य क्षेत्रात अश्या प्रकारची नावीन्य पूर्ण गोष्ट लोकप्रतनिधींच्या माध्यमातून घडलेली दिसून येत नाही. त्या अभद्र परंपरेला खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांनी छेद दिला आहे आणि एकप्रकारे सांस्कृतिक नगरी डोंबिवलीला वैद्यकीय सेवा सुविधांनी सुसज्ज नगरी हा बिरूद देखील मिळवून देण्याचा मानस अजून दृढ केलेला आहे.

तसेच येत्या काळात कल्याण लोकसभा मतदारसंघातील कल्याण पूर्वेत देखील अश्या सुसज्ज सुविधा देण्यासाठी खासदारांनी पाठपुरावा सुरू केला असून लवकरच तोही संकल्प पूर्णत्वास जाईल. डोंबिवलीतील शास्त्रीनगर रुग्णालयातील या अद्यावत सुविधांचा लोकार्पण सोहळा सोमवार ( २६ ऑक्टोबर रोजी) दुपारी १ वाजता पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थित संपन्न होणार आहे.

एकंदरीत डॉक्टर खासदार श्रीकांत शिंदे हे आपल्या मतदारसंघात रस्ते, रेल्वे आदी पायाभूत सुविधांसोबतच मतदारसंघाचा आरोग्य स्तर उंचावण्यासाठी कमालीचे प्रयत्नशील असल्याचे दिसून येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *