चकित करणारे निर्णय : महेंद्रसिंह धोनी कॅप्टन कूल

| मुंबई | काल भारताचा विक्रमादित्य कर्णधार महेंद्रसिंह धोनी याने आंतरराष्ट्रीय क्रिकेट मधून निवृत्ती घेतली. हा रसिकांना एक प्रकारचा धक्काच मनाला जातो. दरम्यान कर्णधार धोनी प्रसिद्ध होता त्याच्या अचाट निर्णयासाठी असेच काही निर्णय, ज्यांनी सर्वांना चकित करून सोडले होते.

त्यातील काही निर्णय :

✓ २००७ टी २० फायनल सामन्याची अंतिम ओव्हर

टी २० विश्व कपमध्ये भारतीय संघ अंतिम सामन्यात पोहोचली. धोनीने अंतिम सामन्यात पाकिस्तान विरुद्ध शेवटच्या ओव्हरमध्ये मिस्बाल उल हक समोर जोगिंदर शर्माला गोलंदाजीची जबाबदारी सोपवली. यावेळी चाहत्यांचा श्वास रोखला गेला होता. मात्र धोनीचा हा निर्णय योग्य ठरला आणि भारत विजयी झाला.

✓ २००९ टी २० विश्व कपमध्ये पूर्ण संघासोबत पत्रकार परिषद :

विरेंद्र सहवाग आणि धोनी यांच्यात होणाऱ्या वादाच्या चर्चा रंगल्या. इंग्लंडमध्ये होणाऱ्या २००९ टी २० च्या विश्व कपच्या अगोदर होणाऱ्या पत्रकार परिषदेत धोनी संपूर्ण संघाला घेऊन पोहोचला. धोनीच्या या निर्णयामुळे सगळेच थक्क झाले.

✓ २०११ विश्व कप अंतिम सामन्यात युवराजच्या अगोदर मैदानावर उतरला धोनी

विश्व कपच्या अंतिम सामन्यात युवराज सिंहच्या अगोदर धोनी मैदानात उतरला हा सर्वात मोठा निर्णय होता. धोनीचा हा प्रयोग खूप महत्वाचा निर्णय ठरला. धोनीचा विजयी छक्का इतका यशस्वी ठरला. भारत संघ २८ वर्षांनंतर विश्व विजेता बनला.

✓अचानक धोनीने वनडे आणि टी२० च्या कॅप्टन पद सोडलं

४ जानेवारी २०१७ रोजी धोनीने अचानक टी-२० आणि वन डेचं कर्णधार पद सोडण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय क्रिकेट प्रेमींसाठी सर्वात मोठा झटका होता.

✓ २०१४ ऑस्ट्रेलिया दौऱ्या दरम्यान टेस्ट सामन्यातून घेतलेला संन्यास

चाहते आणि क्रिकेट तज्ज्ञ धोनीच्या या निर्णयामुळे हैराण झाले. ऑस्ट्रेलिया दौऱ्या दरम्यान त्याने सीरीजमधून टेस्ट क्रिकेटच्या सामन्यातून निवृत्ती घेतल्याचं जाहीर केलं. चार टेस्टची सीरीजमधील तिसरी मॅच संपताच त्याने टेस्टमधून संन्यास घेतला.

✓ १५ ऑगस्ट रोजी आंतरराष्ट्रीय संघातून निवृत्ती

महेंद्र सिंह धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचं जाहीर केलं. महेंद्र सिंह धोनीने इंस्टाग्रामवर पोस्ट करत आपण आंतरराष्ट्रीय सामन्यातून निवृत्ती घेत असल्याच जाहीर केलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *