
श्रध्येय बाबा आमटे यांची आज जयंती..! आपल्या कर्मसिद्धांताने जगभरात असंख्य कर्मवीर घडवणाऱ्या या चोफेर माणसाला विनम्र अभिवादन..!
“अशी सृजनशील साहसे हवी आहेत की जी बीजे पेरून वाट पाहू शकतील उगण्याची… जी भान ठेवून योजना आखू शकतील आणि बेभान होऊन त्या योजना अंमलात आणतील…”
अशा साहसी तरुणांना प्रेरणेचा शंख फुकवून त्यांच्या कणाकणात जाणिवा आणि कर्तव्याच्या ज्वाला फुलवून, वेदनेच्या प्रदेशातही फुले फुलवण्याची ऊर्जा भरणारा युगपुरुष म्हणजे कर्मयोगी बाबा आमटे…
माणसात असून माणूसपण नाकारलेल्या कुष्ठरोगी, अनाथ, निराधार, अंध, अपंग, शोषित, वंचीत आणि उपेक्षित घटकातील लोकांच्या तणा मनात जगण्याची प्रेरणा भरताना, जग प्रवाहाच्या विरोधाला झुगारून याच उपेक्षित वंचितांच्या मनात स्वयंप्रेरनेचे दीप उजळून त्यांच्या आयुष्याला प्रकाशमान करून दाखवण्याची ताकत ठेवणारा तेजपुंज सूर्य म्हणजे बाबा आमटे…
वेदना दाखवून सहानुभूतीचा बाजार मांडणाऱ्या या मुखवटी जगात, वेदनाना फुलांचा सुगंध देऊन, श्रम ही श्रीराम है म्हणत कुष्ठरोगी, अपंग, अंध, मूकबधिर लोकांना श्रमसंस्काराचे धडे गिरवत स्वावलंबी आयुष्य देणारा जीवनदाता म्हणजे बाबा आमटे…
ज्या देशात भूक आणि दारिद्र्य या समस्येवर स्वातंत्र्यापासून निवडणूका लढवणारे आणि; गरीब गरीब म्हणत गरीबाच्या नावावर श्रीमंत होणारे जनपुढारी आहेत. तेच या दारिद्र्यात पिचलेल्या समाजाला सामाजिक स्वातंत्र्यापासून आजही दूर ठेवतायेत की काय? असा प्रश्न पडत असतानाच, त्याच दारिद्र्याच्या वेदनांचा स्वतः एक भाग होऊन त्या वेदना अनुभवून वेदनांना सृजनाची वाट दाखवणारे युवकांचे समाजसेवी दिशादर्शक म्हणजे बाबा आमटे…
उजेडातून अंधारात जावे.. तिथे जाऊन उजळावे… तिथला अंधार नाहीसा झाल्यावर, परत पुढच्या अंधाराच्या शोधात निघावे. असे एक एक करून समाजातले उपेक्षित सारे अंधकार सेवेच्या, सृजनाच्या, धाडसाच्या, माणुसकीच्या दिपाने उजळून टाकावेत. हीच समाजभानाची बीजे प्रत्येक समाजमनात रुजवून प्रत्येकाच्या जगण्यात आनंद दिप तेजवणारे दीपस्तंभ बाबा आमटे…
” माणूस एकदाच जन्माला येतो, याच जन्मात जगण्याचे गाणे गुणगुणत इतरांना आनंद द्यावा आणि त्याच जगण्याच्या ओलाव्यातून या मातीत कायम मिसळून टाकणारं हे सूंदर जगणं प्रेम, आपुलकी, माणुसकीच्या धारेने कायम खळाळत ठरवणं हेच खरं जीवन… या जीवनात बाबा आमटेंच्या स्मृती कुणालाही अमृत्वाकडे घेऊन जातील. त्यांच्या या जन्म दिवशी त्यांच्या कार्यातुन प्रेरित होऊन सृजनशील, मानवतावादी ध्येय वेडं होऊन जगण्याचा तरुणाईनं ध्यास घ्यावा हिच बाबांची इच्छा…
महान माणसाच्या या जन्मदिवशी त्यांच्या तेजस्वी जगण्याला, उत्साही व्यक्तिमत्वाला, सर्जनशील पराक्रमाला, धाडसी साहसाला त्यांच्या अखंड कार्य प्रेरणेला त्रिवार सलाम…
– दादासाहेब श्रीकिसन थेटे, समाजभान, महाराष्ट्र राज्य
- आधी संपलेला पक्ष अशी टीका, आता युतीसाठी विनवण्या – एकनाथ शिंदे
एकनाथ शिंदे यांची उद्धव ठाकरेंवर बोचरी टीका - जळगावात तरुणीची अत्याचार करून हत्या
- तिहेरी हत्याकांडाने हादरला रायगड जिल्हा…एकाच कुटुंबातील तिघांची निर्घृण हत्या
7 महिन्याच्या गर्भवती महिलेच्या हत्येने हुतात्म्यांची भूमी सुन्न.. - महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना ठाणे महापालिका जिल्हा कार्यकारिणी स्थापन
राज्य कोषाध्यक्ष श्री अरुण बडे आणि ठाणे जिल्ह्या अध्यक्ष अरुण कराळे यांच्या निरीक्षणात पार पडली सभा - मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील सी.सी टीव्हीसाठीचे मध्यवर्ती शाळा नियंत्रण कक्षाचे दूरदूरश्यप्रणालीद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण संपन्न
*मिरा-भाईंदर महानगरपालिकेचे अनुकरण इतर महानगरपालिकांनीही करावे – मुख्यमंत्री