जुनी पेन्शन हक्क संघटनेकडून शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची भेट घेऊन निवेदन सादर..!

| जालना | सविस्तर असे की, काल दि.१७ सप्टेंबर रोजी शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांना जालना येथे आमदार कैलासजी गोरंट्याल यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटन तर्फे संघटनेचे राज्यप्रसिद्धीप्रमुख संतोष देशपांडे यांनी विविध मागण्यांचे निवेदन सादर केले. सध्या NPS मध्ये वर्ग करण्याची सुरू आलेली प्रक्रिया आणि इतर काही मुद्द्यांवर निवेदन देवून चर्चा करण्यात आली.

या सर्व मागण्या बाबत शालेय शिक्षणमंत्री वर्षाताई गायकवाड यांनी सकारात्मक प्रतिसाद देत संघटनेच्या मागण्याचे निवेदन स्वीकारले व लवकरच यावर सकारात्मक कार्यवाही होईल असे आश्वासन दिले.

या आहेत मागण्या :

✓ २००५ नंतर सेवेत रुजू कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करणे.
✓ २००५ नंतर सेवेत रुजू अनेक कर्मचारी दुर्दैवाने मयत झाले त्यांना शासनाने आजपर्यंत काहीही लाभ दिला नाही, त्यांच्या कुटुंबियांना तात्काळ फॅमिली पेन्शन, ग्रॅच्युईटी द्यावी.
✓ डिसीपीएस योजने अंतर्गत २००५ पासून जी कपात झालेली आहे त्याच्या हिशोबाच्या बाबत तात्काळ कार्यवाही व्हावी.
✓ राज्यभरात केली जात असलेली एनपीएसची सक्ती थांबवून एनपीएसचीची अंमलबजावणी नेमकी कशी असणार याबाबत संभ्रम दूर करावा.
✓ जिल्हा बदली झालेल्या शिक्षकांच्या पूर्वीच्या व आताच्या सेवेच्या ठिकाणी झालेल्या डिसीपीएस कपातीचा हिशोब एकाच खात्यात असावा.
✓ २००५ ते २०२० दरम्यान सेवानिवृत्त झालेल्या डिसीपीएस धारकांना कोणत्याही प्रकारचा लाभ शासनाने दिला नाही, त्यांचे भविष्य देखील अंधकारमय झाले आहे. त्याबाबत योग्य निर्णय व्हावा.
✓ प्रशासनाने एनपीएसची ची कोणत्याही प्रकारची सक्ती न करता त्याबाबतीत शिक्षक व कर्मचाऱ्यांची असलेली संभ्रमावस्था तात्काळ दूर करावी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *