| पुणे | जिल्हा परिषद प्राथमिक शाळा माण ता. मुळशी जि. पुणे येथील चि. राजू शरणाप्पा कांबळे याने इ.८वी च्या शिष्यवृत्ती परीक्षेत जिल्हा गुणवत्ता यादीत येण्याचा बहुमान पटकावला. महाराष्ट्र राज्य परीक्षा परीषद पुणे यांच्या वतीने दरवर्षी इ.५वी व ८ वी च्या वर्गातील विद्यार्थांसाठी शिष्यवृत्ती परीक्षा घेण्यात येते. फेब्रुवारी २०२० मध्ये झालेल्या परीक्षेचा अंतिम निकाल नुकताच जाहीर झाला.
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा माण ता. मुळशी येथील इ.८वी च्या वर्गातील चि. राजू शरणाप्पा कांबळे याने १८० गुण मिळवून जिल्हा गुणवत्ता यादीत स्थान पटकावले. राजू कांबळेला मुख्याध्यापक श्री.आत्माराम वाघमारे, वर्गशिक्षक श्री. लक्ष्मण दिघे, सौ. आशा मकवान, श्रीम. प्रिती चौहान यांनी मार्गदर्शन केले.
राजूच्या यशाबद्दल मुळशी पंचायत समितीचे सभापती श्री. पांडूरंग ओझरकर, गटविकास अधिकारी श्री. संदिप जठार, गटशिक्षणाधिकारी श्री. माणिक बांगर, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष पंडीत गवारे, केंद्र प्रमुख सुरेश साबळे, ग्रामविकास अधिकारी भरत पाटील, माजी सरपंच राजेंद्र भोसले, माजी सरपंच बजाबा शेळके, सुवर्णा गराडे, डॉ. यशराज पारखी, पांडूरंग महाडीक, पालक , ग्रामस्थ यांनी अभिनंदन केले.
- जळगावात तरुणीची अत्याचार करून हत्या
- तिहेरी हत्याकांडाने हादरला रायगड जिल्हा…एकाच कुटुंबातील तिघांची निर्घृण हत्या
7 महिन्याच्या गर्भवती महिलेच्या हत्येने हुतात्म्यांची भूमी सुन्न.. - महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना ठाणे महापालिका जिल्हा कार्यकारिणी स्थापन
राज्य कोषाध्यक्ष श्री अरुण बडे आणि ठाणे जिल्ह्या अध्यक्ष अरुण कराळे यांच्या निरीक्षणात पार पडली सभा - मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील सी.सी टीव्हीसाठीचे मध्यवर्ती शाळा नियंत्रण कक्षाचे दूरदूरश्यप्रणालीद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण संपन्न
*मिरा-भाईंदर महानगरपालिकेचे अनुकरण इतर महानगरपालिकांनीही करावे – मुख्यमंत्री - कार्यसम्राट दमदार आमदार महेंद्रशेठ थोरवे ६०००० च्या मताधिक्याने विधानसभेवर जाणार…पालकमंत्री उदयजी सामंत यांचे प्रतिपादन .
महाआघाडी सह मनसेलाही खिंडार…आमदार थोरवेंचा जलवा कायम .