डाळज मधील 101 वर्षीय आजी कोरोनाला हरवून सुखरूप घरी ; आजींच्या जिद्दीने ठेवला तरूणाई पुढे आदर्श..

| इंदापूर/ महादेव बंडगर | संपूर्ण जगाला कोरोना या महामारी ने वेढले असताना पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यामधील डाळज नंबर 1 या गावातील 101 वर्षाच्या मंडोदरी हरिबा जगताप या आजी पंधरा दिवसाच्या अथक प्रयत्नानंतर कोरोना वर मात करून घरी सुखरूप पोहोचल्या आहेत. भिगवण येथे नव्याने सुरू झालेल्या कोविड हॉस्पिटलमधील डॉ. गाढवे, डॉ. पवार व त्यांच्या सर्व स्टाफने या आजीवर औषधोपचार करून आजीला सुखरूप घरी पोहोचवले आहे. त्यामुळे आजीच्या घरातील आणि गावातील लोकांनी 101 वर्षाच्या आजीने कोरोनावर मात केल्यामुळे गावामध्ये जंगी स्वागत केले. तसेच घरातील सर्व मुले, सुना, नातवंडे यांनी आजीला फुलाच्या पायघड्या घालून ओवाळून हार- फुले देऊन आजीचा सत्कार केला.

त्यामुळे आजीने आजच्या चाळीशी मध्ये आपले प्राण गमावणाऱ्या अनेक तरुणांना लाजविले असून इच्छाशक्तीच्या बळावर कोणत्याही वयातील व्यक्ती कसल्याही आघाताला घाबरत नसून सर्वांनी धीराने संकटांना सामोरे गेले पाहिजे. हेच या 101 वर्षाच्या आजीने दाखवून दिले आहे. आजीला सुखरूप कोरोना महामारी तून बरे करणाऱ्या डॉक्टर व त्यांच्या सर्व स्टाफचा हार फुले देऊन आजीच्या कुटुंबातील लोकांनी सत्कार केला.

या आजी कर्मयोगी शंकररावजी पाटील सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक गजानन बापू जगताप यांच्या मातोश्री असून त्यांचे नातू महेश जगताप तसेच नितीन हनुमंत जगताप, संतोष जगताप या सर्वांनी आजीला बरे करणाऱ्या डॉक्टरांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे. त्यांच्या घरातील एक दीपस्तंभ देवरूपी डॉक्टरांनी परत सुखरूप पाठवला अशी भावना आजीच्या कुटुंबीयांनी यावेळी व्यक्त केली.

Leave a Reply

Your email address will not be published.