धक्कादायक : कोरोना मुक्त झालेल्या रुग्णांकडून देखील होतोय कोरोनाचा प्रसार..?

| मुंबई | सलग दोन दिवस महाराष्ट्रात कोरोना मुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढली आहे. रविवारी १५ हजारपेक्षा अधिक रुग्णांनी कोरोनावर मात केली. देशातही ५५ लाखांपेक्षा अधिक कोरोना रुग्ण बरे झाले आहेत. ही दिलासादायक बातमी असताना आता एक चिंताजनक बातमी येते आहे. ती म्हणजे कोरोनातून बरे झालेले रुग्णही कोरोना पसरवू शकतात. या रुग्णांच्या शरीरात काही दिवस कोरोनाव्हायरस असतो. त्यामुळे हे रुग्ण बरे झाले तरी त्यांच्यामार्फत कोरोना पसरू शकतो, असं संशोधकांनी म्हटलं आहे.

अमेरिकेत बऱ्या झालेल्या कोरोना रुग्णांचा अभ्यास करण्यात आला. कोरोनावर मात केलेल्या गंभीर रुग्णांच्या शरीरात कोरोनाव्हायरस ९० दिवस म्हणजे तब्बल तीन महिन्यांपर्यंत राहतो.

अमेरिकेतील सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शनने दिलेल्या माहितीनुसार, कोरोनाच्या गंभीर अवस्थेतून बाहेर पडलेले रुग्ण ९० दिवसांपर्यंत कोरोना संक्रमण पसरवू शकतात. ज्या रुग्णांमध्ये कोरोनाची सौम्य लक्षणं असतात असे रुग्ण बरे झाल्यानंतरही त्यांच्या शरीरात १० दिवस कोरोनाव्हायरस असतो. असे रुग्ण रोगप्रतिकारक शक्ती कमजोर असलेल्या व्यक्तींच्या संपर्कात आल्यास त्यांच्या संक्रमणाची शक्यता वाढते. त्यामुळे कोरोनातून बऱ्या झालेल्या रुग्णांनी जास्त घराबाहेर पडू नये, असा सल्ला देण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *