धक्कादायक : कल्याणमधील एकाच घरातील ३० व्यक्तींना कोरोनाची बाथा..!

| कल्याण | कल्याण डोंबिवली मध्ये काही अंशी कोरोना रुग्णांची कमी झालेली संख्या पुन्हा वाढताना दिसून येत आहे. कल्याण-डोंबिवलीमध्येही कोरोना रुग्णांची आकडेवारी चिंता वाढवणारी असताना कल्याणमध्ये गणपतीसाठी एकत्र आलेल्या कुटुंबातील ३० जण कोरोना पॉझिटिव्ह आल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.

कल्याणच्या जोशीबाग परिसरातील या प्रकाराने एकच खळबळ उडाली आहे. ४ मजली इमारतीमध्ये ३३ जणांचं कुटुंब राहतं. गणपती दरम्यान संपूर्ण कुटुंब एकत्र आलं होतं. एका मुलाला कोरोनाची लागण झाली होती. त्यातून पुढे ३३ पैकी ३० जण कोरोना पॉझिटिव्ह आल्याची माहिती समोर आली आहे.

दरम्यान, कल्याण-डोंबिवलीतील कोरोना रुग्णांची संख्या चिंता वाढवणारी आहे. कल्याण-डोंबिवलीमध्ये आतापर्यंत एकूण ३३ हजार ८३९ कोरोना रुग्ण आढळले आहेत. तर आतापर्यंत कोरोनामुळे ६७२ जणांचा मृत्यू झाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *