नूतन शिक्षक आमदार आसगावकर यांची पेन्शन हक्क संघटनेकडून सदिच्छा भेट, पेन्शनसह विविध प्रश्नांवर विधानभवनात आवाज उठविण्याची केली मागणी…!

| कोल्हापूर | काल महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटन जिल्हा शाखा कोल्हापूरच्या वतीने नूतन शिक्षक आमदार जयंत आसगावकर यांची सदिच्छा भेट घेऊन सत्कार करण्यात आला. याचवेळी शिक्षकांच्या सद्य स्थितीतील अत्यंत महत्त्वपूर्ण विषयांवर देखील सखोल चर्चा करत निवेदन देण्यात आले. यामध्ये 1 नोव्हेंबर 2005 नंतर नियुक्त सर्व शिक्षक व इतर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू व्हावी, शिक्षण सेवक पद रद्द व्हावे अथवा सदर शिक्षक बांधवांचे मानधन 25 हजार रुपये करण्यात यावे, शिक्षकांना आश्वासित प्रगती योजना (१०-२०-३०) लागू करण्यात यावी या प्रमुख मागण्यांचा समावेश होता.

दरम्यान आमदार महोदयांनी याप्रसंगी सद्यस्थितीत चालू असलेल्या पेन्शन योजनेचे फायदे तोटे जुनी पेन्शन योजनेचे महत्त्व शिक्षकांवरील अन्याय कारक शिक्षणसेवक पद व अन्य प्रश्नांच्या बाबत अत्यंत दिलखुलास चर्चा करत भविष्यात या सर्व प्रश्नांना न्याय देण्यासाठी मंत्रालयीन स्तरावर पाठपुरावा करणार असल्याचे आश्वासन दिले.

या सदिच्छा सत्कार प्रसंगी जिल्हाध्यक्ष मंगेश धनवडे, जिल्हाकोषाध्यक्ष निलेश कारंडे, जिल्हाउपाध्यक्ष बी एल कांबळे, जिल्हा प्रवक्ते प्रमोद पाटील, जिल्हा संघटक अमोल गायकवाड, कागल तालुकाध्यक्ष गजानन कुंभार, दत्तात्रय गायकवाड, दिपक गायकवाड, स्वप्निल सांगले, मारुती पोवार, बालाजी पांढरे, प्रकाश चव्हाण, विश्वनाथ बोराटे, प्रसाद सुतार, महेश गुरव, सचिन हरोलीकर, राहुल पाटील, अनिल मोरे, दीपक पाटील उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *