| पुणे | उत्तम आरोग्यासाठी मन शांत व संतुलित राहणे गरजेचे आहे. त्याअनुषंगाने शिक्षक व अधिकारी वर्गासाठी येत्या २४ व २५ सप्टेंबर रोजी ऑनलाइन ध्यान साधनेचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
राज्य शासनाचा शालेय शिक्षण विभाग व इगतपुरीचे विपश्यना विशोधन केंद्र यांच्या वतीने मित्र उपक्रमांतर्गत आनापान साधना वर्ग हा उपक्रम राज्यातील सर्व प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये सुरू करण्याबाबत २७ जानेवारी २०१२ च्या शासन निर्णयानुसार आदेशित केले आहे. हा उपक्रम इयत्ता पाचवी ते बारावीच्या विद्यार्थ्यांच्या मानसिक व बौद्धिक वाढीसाठी उपयुक्त ठरला आहे. उपक्रम राबवित असताना येणाऱ्या अडचणीही दूर करण्यात येत आहेत.
कोरोना काळात विद्यार्थी भय व तणाव अशा अत्यंत कठीण परिस्थितीला तोंड देत आहेत. मानसिक स्थितीचा सामना करण्यासाठी व मनोबल प्राप्त करण्यासाठी या साधनेचा लाभ विद्यार्थी, शिक्षक व अधिकारी यांना टप्प्या टप्प्याने देण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
सकाळी ७ ते ९ या कालावधीत प्रशिक्षण मिळणार आहे. घरातून प्रशिक्षणात सहभागी होणार असाल तर कुटुंबातील इतर सदस्यांनाही प्रशिक्षणात सहभागी होता येणार आहे. यासाठी कुटुंबातील इतर सदस्यांची नोंदणी करणे आवश्यक नाही, अशा असे शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी यांनी सांगितले.
- जळगावात तरुणीची अत्याचार करून हत्या
- तिहेरी हत्याकांडाने हादरला रायगड जिल्हा…एकाच कुटुंबातील तिघांची निर्घृण हत्या
7 महिन्याच्या गर्भवती महिलेच्या हत्येने हुतात्म्यांची भूमी सुन्न.. - महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना ठाणे महापालिका जिल्हा कार्यकारिणी स्थापन
राज्य कोषाध्यक्ष श्री अरुण बडे आणि ठाणे जिल्ह्या अध्यक्ष अरुण कराळे यांच्या निरीक्षणात पार पडली सभा - मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील सी.सी टीव्हीसाठीचे मध्यवर्ती शाळा नियंत्रण कक्षाचे दूरदूरश्यप्रणालीद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण संपन्न
*मिरा-भाईंदर महानगरपालिकेचे अनुकरण इतर महानगरपालिकांनीही करावे – मुख्यमंत्री - कार्यसम्राट दमदार आमदार महेंद्रशेठ थोरवे ६०००० च्या मताधिक्याने विधानसभेवर जाणार…पालकमंत्री उदयजी सामंत यांचे प्रतिपादन .
महाआघाडी सह मनसेलाही खिंडार…आमदार थोरवेंचा जलवा कायम .