पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्याकडून भिगवण येथे “माझे कुटुंब, माझी जबाबदारी” सर्वेक्षणाच्या 2 ऱ्या टप्प्याची पाहणी..

| इंदापूर/ महादेव बंडगर | पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख या यांनी आज भिगवण ता. इंदापूर येथे ” माझे कुटुंब, माझी जबाबदारी” या सर्वेक्षणाच्या दुसऱ्या टप्प्याची प्रत्यक्ष पाहणी केली.

त्यावेळी त्यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना या सर्वेक्षणातून गोळा केलेली सर्व माहिती ऑनलाईन अपलोड करण्याबाबत सूचना केल्या.तसेच सर्व माहितीवरून कोरोना संशयित रुग्णांची नोंद अचूकपणे घेऊन लक्षणे जाणवणाऱ्या रुग्णांना योग्‍य ते औषधोपचार मिळण्यासाठी सहकार्य करावे. या गोष्टी प्राधान्याने कराव्यात अशा सूचनाही त्यांनी दिल्या. त्याचबरोबर यावेळी भिगवन मध्ये चालू असलेल्या दुसऱ्या टप्प्याच्या सर्वेक्षणाची पाहणीही त्यांनी प्रत्यक्ष सर्वेक्षणाच्या ठिकाणी जाऊन केली. आरोग्य कर्मचाऱ्यांशी व सदर कुटुंबांशीही त्यांनी संवाद साधला.

यावेळी बारामतीचे उपविभागीय अधिकारी श्री दादासाहेब कांबळे, जिल्हा परिषद सदस्य श्री हनुमंतनाना बंडगर,जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ भगवान पवार, गटविकास अधिकारी विजयकुमार परीट, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. गावडे, डॉ. प्रशांत महाजन, प्राथमिक आरोग्य केंद्र भिगवण चे डॉ गणेश पवार, डॉ रोहन कुंभार, सचिन बोगावत व आरोग्य कर्मचारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published.