पुणे जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षक बदल्यांचा प्रश्न रेंगाळला…

| पुणे/ महादेव बंडगर | प्राथमिक शिक्षकांच्या बदल्यांचा प्रश्न महाराष्ट्रात नेहमीच गाजतो. त्याला हे वर्ष सुद्धा अपवाद राहिले नाही. भाजप सरकार ने ऑनलाइन बदल्यांचा कायदा आणून मोठ्या संख्येने प्राथमिक शिक्षकांच्या बदल्या केल्या. त्यातील संवर्ग पद्धतीमुळे न्यायालयाने देखील त्यास मान्यता दिली. सलग 2 वर्षे त्याप्रमाणे बदल्या झाल्या. मात्र कोरोनामुळे शासनाने बदल्या थांबवल्या. ऑनलाईन पद्धतीने बदल्या झाल्याने अनेक शिक्षकांवर अन्याय झाला व नव्याने बदलीस पात्र असणारे दिव्यांग, गंभीर आजाराने ग्रस्त, मतिमंद मुलांचे पालक, सेवाज्येष्ठ व पती पत्नी एकत्रीकरण लागू असणाऱ्या शिक्षकांमध्ये अन्यायाची भावना निर्माण झाली. कारण सरकारने इतर खात्यांच्या बदल्या ऑगस्ट अखेर उरकून घेतल्या. त्यामुळे शिक्षक संघटना आणि सरकार यांच्यामध्ये संघर्षाचे वातावरण तयार झाले. तेव्हा आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांनी त्यामध्ये मध्यस्थी करून सर्वच पात्र शिक्षकांच्या सरसकट बदल्या करण्यापेक्षा जे शिक्षक नव्याने बदलीस पात्र असणारे दिव्यांग, गंभीर आजाराने ग्रस्त, मतिमंद मुलांचे पालक, सेवाज्येष्ठ व पती पत्नी एकत्रीकरण लागू असणारे शिक्षक व ऑनलाईन बदल्यात गैरसोय झालेले शिक्षक अशांच्या केवळ विनंती बदल्या करण्यात यावा असा तोडगा काढला. केवळ रिक्त पदी बदल्या होणार असल्याने व पर्यायाने कोणाचीही गैरसोय होणार नसल्याने सर्वांनी त्यास मान्यता दिली. या बदल्या ऑनलाइन व राज्यस्तरावर होणार नसल्याने जिल्हा परीषद स्तरावर होणार असल्याने शासनाने अध्यादेश काढून तसे अधिकार जिल्हा परिषदांना बहाल केले. त्याप्रमाणे महाराष्ट्रात बहुतेक जिल्ह्यात याप्रमाणे विनंती बदल्या करण्यात आल्या.

मात्र पुणे जिल्ह्यात शासनाने तब्बल 2 वेळा मुदतवाढ देऊन देखील जिल्हा परिषद प्रशासनास या बदल्या विहित मुदतीत पूर्ण करता आल्या नाहीत. शिक्षक संघटनांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांच्या पुढाकाराने ही प्रक्रिया तिसऱ्यांदा सुरु झाली. ती पुन्हा लाल फितीच्या कारभारात अडकली. अपंग कर्मचारी कल्याण महासंघ पुणे शाखेने याबाबतीत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

✓ ” आंतरजिल्हा बदलीने येणाऱ्या शिक्षकांना लवकरच पदस्थापना देण्याचे घाटत आहे मात्र त्यापूर्वी नव्याने बदलीस पात्र असणारे दिव्यांग, गंभीर आजाराने ग्रस्त, मतिमंद मुलांचे पालक, सेवाज्येष्ठ व पती पत्नी एकत्रीकरण लागू असणाऱ्या शिक्षकांच्या विनंती बदल्या न केल्यास त्यांच्यावर जाणूनबुजून अन्याय केल्यासारखे आहे. असे निवेदन शिरूर तालुका प्राथमिक शिक्षक संघाने आमदार अशोकबापू पवार यांना दिले आहे. याप्रकरणी सखोल लक्ष घालून लवकरच ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ साहेबांची भेट घेऊन प्रश्न मार्गी लावणार असल्याचे आश्वासन आमदार अशोक पवार यांनी दिले आहे. “

संतोषकुमार थोपटे , अध्यक्ष शिरूर तालुका प्राथमिक शिक्षक संघ.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *