| सोलापूर / महेश देशमुख | संभाजी ब्रिगेडचे पुणे पदवीधर मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार इंजिनिअर मनोजकुमार गायकवाड यांनी पुण्यातील विधान भवन येथे उमेदवारी अर्ज दाखल केला. संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष मनोजदादा आखरे यांच्या हस्ते भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करून उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व नियमांचे पालन करून ही प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. यावेळी संभाजी बिग्रेड चे प्रदेश कोषाध्यक्ष संतोष गाजरे, प्रदेश प्रवक्ते गंगाधर बनबरे, प्रदेश उपाध्यक्ष आण्णासाहेब सावंत, प्रदेश उपाध्यक्ष अभिमन्यु पवार, विभागीय अध्यक्ष किरण घाडगे,पुणे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर घाडगे, उत्तम कामठे,महिला आघाडी जिल्हाध्यक्ष मोहिनीताई रणदिवे, सोलापूर जिल्हाध्यक्ष सचिनबापू जगताप, सोमनाथ राऊत,सांगली जिल्हाध्यक्ष सुयोग औंधकर, राजेंद पाटील, कोल्हापूर जिल्हाध्यक्ष रुपेश पाटील, सोलापूर जिल्हा सचिव सुहास टोणपे, जिल्हा उपाध्यक्ष शंकर पोळ, जिल्हा संघटक गणेश सव्वाशे, दिनेश जगदाळे,माढा तालुकाध्यक्ष बालाजी जगताप, करमाळा तालुकाध्यक्ष अमित घोगरे, तालुका सचिव गणेश डोके,प्रविण कदम,स्वप्निल गायकवाड, विश्वनाथ गायकवाड,किशोर मोळक,पुणे पदवीधर मतदारसंघातील सर्व महिला, शिक्षक, विद्यार्थी, कामगार, वाहतूक आघाडीचे पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी संवाद साधताना गायकवाड म्हणाले की, आतापर्यंत निवडून आलेल्या कोणत्याही आमदारांनी पदवीधरांसाठी काम केले नाही, त्यांनी केवळ आपल्या पक्षासाठी काम केले. सर्वात जास्त प्रमाण असलेला सुशिक्षित पदवीधर वर्ग आज बेरोजगारीमुळे आत्महत्या करत आहे. पदवीधरच्या आमदारांनी फक्त पक्षासाठी काम केले आहे. पुरोगामी विचारांच्या बहुजन तरुणांची संघटना असलेल्या संभाजी ब्रिगेडने पदवीधरांचे, शिक्षकांचे, प्रश्न, समस्या सोडवण्यासाठी विविध आंदोलने केली असून विधान परिषदेत पदवीधरांचे , शिक्षकांचे प्रश्न, समस्या मार्गी लावण्यासाठी, पदवीधरांना न्याय मिळवून देण्यासाठी व शाश्वत बदल घडवण्यासाठी मी निवडणुक लढवत आहे.
” पुणे पदवीधर मतदारसंघातील विद्यमान पदवीधर आमदार पूर्णपणे निष्क्रिय ठरले असून इतर उमेदवारांनीही पदवीधरांसाठी म्हणावे तसे काम केलेले नाही. संभाजी बिग्रेडने पदवीधर व शिक्षकांच्या समस्या सोडविण्यासाठी आतापर्यंत विविध आंदोलने केली असून समस्या सोडविण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता विधिमंडळाच्या सभागृहात पदवीधरांचे व शिक्षकांचे प्रश्न सोडवण्यासाठी संभाजी ब्रिगेड ही निवडणूक लढवत आहे.”
– सचिन जगताप, जिल्हाध्यक्ष संभाजी ब्रिगेड, सोलापूर.
- जळगावात तरुणीची अत्याचार करून हत्या
- तिहेरी हत्याकांडाने हादरला रायगड जिल्हा…एकाच कुटुंबातील तिघांची निर्घृण हत्या
7 महिन्याच्या गर्भवती महिलेच्या हत्येने हुतात्म्यांची भूमी सुन्न.. - महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना ठाणे महापालिका जिल्हा कार्यकारिणी स्थापन
राज्य कोषाध्यक्ष श्री अरुण बडे आणि ठाणे जिल्ह्या अध्यक्ष अरुण कराळे यांच्या निरीक्षणात पार पडली सभा - मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील सी.सी टीव्हीसाठीचे मध्यवर्ती शाळा नियंत्रण कक्षाचे दूरदूरश्यप्रणालीद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण संपन्न
*मिरा-भाईंदर महानगरपालिकेचे अनुकरण इतर महानगरपालिकांनीही करावे – मुख्यमंत्री - कार्यसम्राट दमदार आमदार महेंद्रशेठ थोरवे ६०००० च्या मताधिक्याने विधानसभेवर जाणार…पालकमंत्री उदयजी सामंत यांचे प्रतिपादन .
महाआघाडी सह मनसेलाही खिंडार…आमदार थोरवेंचा जलवा कायम .