प्रवाशांची मागणी असणारी ‘या मार्गावरील’ रेल्वे सुरू करावी- मनसेच्या पांडुरंग ढेरेंची मागणी

| महेश देशमुख / सोलापूर | अनलॉक नंतर प्रवासासाठी लोक बाहेर पडत आहेत. खासगी गाड्यांचा खर्च सामान्यांच्या आवाक्याबाहेर गेला आहे. रेल्वे सारख्या स्वस्त व सुरक्षित पर्यायासाठी प्रवासी इच्छुक आहेत. त्यामुळे प्रवाशांच्या सोयीसाठी कुर्डूवाडी-पंढरपुर-कोल्हापुर रेल्वे सुरू करण्यात यावी अशा मागणीचे निवेदन महाराष्ट्र नवनिर्माण वाहतुक सेनेचे सोलापुर जिल्हा उपाध्यक्ष पांडुरंग ढेरे यांनी कुर्डूवाडी रेल्वे स्टेशन प्रबंधक आर.डी चौधरी यांना दिले आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंदिरे बंद करण्यात आली होती पण कोरोनाचा पार्दुभाव कमी झाल्यामुळे मंदिरे उघडण्यात आली आहेत. पंढरपूर व कोल्हापूर प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असल्याने येथे भाविक रोज मोठ्या संख्येने येत असतात. रेल्वे सेवा सुरू नसल्याने या सेवेवर अवलंबून असणाऱ्या भाविक प्रवाशांना या मार्गावर प्रवासाच्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे तसेच अनलॉकची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर अनेकांना कामानिमित्त दररोज या मार्गावर प्रवास करावा लागतो त्यांचाही रेल्वे सेवा सुरू केल्यास फायदा होणार आहे त्यामुळे प्रवाशांच्या सोयीसाठी ही रेल्वे सेवा सुरू करण्यात यावी अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण वाहतुक सेनेच्या वतीने आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. 

यावेळी विद्यार्थी सेना माढा तालुका अध्यक्ष राहुल सुर्वे, शहर अध्यक्ष सागर बंदपट्टे, शहर संघटक आकाश  लांडे, उपाध्यक्ष गणेश चोैधरी, सरचिटणीस सोमनाथ पवार, सोमनाथ शिरगिरे नागेश सादरे, रामभाऊ थोरात, बालाजी कदम आदी उपस्थित होते.

” कोरोना लॉकडाऊनमुळे गेल्या सहा महिन्यांपासून ठप्प असलेली रेल्वेची वाहतूक सध्या हळूहळू रूळावर येत आहे; यामध्ये कुर्डूवाडी, पंढरपुर, कोल्हापुर या मार्गावरील प्रवाशांच्या नेमक्या गरजेचा विचार करून रेल्वे प्रशासनाने या मार्गावरील रेल्वे वाहतूक सुरू करावी.”

– पांडुरंग ढेरे, जिल्हा उपाध्यक्ष महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेना, सोलापूर.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *