प्रसिद्ध समाजसेविका वैशाली पाटील यांना “महाराष्ट्र दर्पण सामाजिक कृतज्ञता” पुरस्कार..!

| मुंबई | जय महाराष्ट्र पत्रकार, वृत्तपत्र लेखक व कवी महासंघ यांच्या रविवार दिनांक १३ डिसेंबर,२०२० रोजी चौथ्या वर्धापन दिनानिमित्त मुंबई मराठी पत्रकार संघाच्या कार्यालयात पार पडलेल्या कार्यक्रमात सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल ‘कुसुम वात्सल्य फाउंडेशन’ च्या संस्थापक अध्यक्षा वैशाली पाटील यांचा “महाराष्ट्र दर्पण सामाजिक कृतज्ञता” पुरस्काराने सन्मान करण्यात आला.

याप्रसंगी प्रमुख पाहुणे लोकप्रिय गायक नंदेश उमप, कवी डॉ. शितलताई मालुसरे, वरिष्ठ पत्रकार नरेंद्र वाबळे, माजी आमदार अशोकजी धात्रक, नितीन चौधरी, जयश्री सावर्डेकर, स्वप्नील वाडेकर, ज्ञानेश्वर माळी आदी मान्यवर उपस्थित होते.

महाराष्ट्र शासनाच्या माझं कुटुंब माझी जबाबदारी या अभियानाचा जनजागृती करण्यात आली. कार्यक्रमाचे आयोजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश जाधव, विलास देवळेकर, सुरज भोई यांनी केले होते. वैशाली पाटील या गेली कित्येक वर्षे सामाजिक, शेती, कला, क्रीडा, शैक्षणिक अशा विविध क्षेत्रात कार्यरत आहेत.

समाजातील अंध अपंग, अनाथ, विकलांग व गरजू लोकांना देखील मदत केली आहे तसेच महिलांना समाजामध्ये व्यासपीठ मिळवून देणे, त्यांचा सर्वांगीण विकास करणे,त्यांना स्वावलंबी बनविणे अशा अनेक प्रकारे महिलांना सतत मदत करत असतात. त्यांच्या या कार्याची दखल घेत महाराष्ट्र नाभिक महामंडळ पुणे जिल्हा महिला आघाडीच्या वतीने देखील त्यांना सन्मानित करण्यात आले.

वैशाली पाटील या कुसुमवत्सल्य फाउंडेशन व्यतिरिक्त अखिल युवा पत्रकार संघ पुणे शहरच्या महिला उपाध्यक्षा तसेच पोलीस प्रवाह न्यूज च्या पत्रकार म्हणून देखील कार्यरत आहेत. त्यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आल्याने त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *