फडणवीसांनी दिल्लीत जावे, अशी सुधीर मुनगंटीवारांचीच इच्छा…!

| मुंबई | विरोधी पक्षनेते मोठा विचार करतात. ते संपूर्ण देशाचा विचार करतात. त्यामुळे त्यांनी दिल्लीत खरेच जावे तिथला माणूस फक्त ठराविकच विचार करतोय म्हणून आमचा विरोध करतोय. तुम्ही गेलात आम्ही तुमचा विचार करू असे सांगत फडणवीसांनी दिल्लीत जावं अशी सुधीर मुनगंटीवारांचीही खरी इच्छा असल्याचा चिमटा मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी काढला.

फडणवीस यांनी दिल्लीत जावे, अशी आग्रही सूचना मुख्यमंत्र्यांनी करताच एकच हंशा पिकला. मागील काळात अनेकजण सरकार पाडण्यासाठी कुंडल्या काढत होते आता ते सरकारच्या कामगिरीचे पुस्तक वाचू लागले आहेत, असाही टोला मुख्यमंत्र्यांनी लगावला.

फडणवीस यांनी हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी आज जोरदार भाषण सरकारला अनेक प्रश्न विचारले. केंद्र सरकारने केलेले कृषी कायदे कसे उपयोगी आहेत, हे त्यांनी आवर्जून सांगितले. त्याला उत्तर देताना महसूलमंत्री बाळासाहेब थोरात फडणवीस यांनी चांगली मांडणी केली. त्यांनी ते दिल्लीत या कायद्याच्या विरोधात आंदोलनास बसलेल्या शेतक-यांना समजून सांगावे, असे म्हणत तसे त्यांना दिल्लीला जायचे वेध आहेतच, असा टोमणा मारला. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी फडणवीस हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ब्लू आईड बॉय आहेत, असे सांगत त्यांनी मोदींना सांगून महाराष्ट्रासाठी कोरोना काळात जास्त मदत मिळवून आणायला हवी होती. मात्र तसे झाले नाही, असे त्यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published.