भिगवणला रॅपिड अँटिजेंन टेस्ट सेंटर सुरू करा – मदनवाडीचे उपसरपंच तेजस देवकाते यांची मागणी.

| इंदापूर/ महादेव बंडगर | इंदापूर तालुक्यामध्ये कोरोणाचा झपाट्याने प्रसार होत असून तालुक्‍यात तालुक्यातील जनतेमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर इंदापूर तालुक्यामध्ये फक्त इंदापूर या ठिकाणी रॅपिड अँटिजेंन टेस्ट केली जाते.त्यामुळे इंदापूर येथील केंद्रावर येणारा ताण कमी करणे व जनतेच्या सोयीसाठी भिगवण याठिकाणी नवीन रॅपिड चाचणी सेंटर सुरू करावे अशी मागणी मदनवाडीचे उपसरपंच तेजस देवकाते यांनी निवेदनाद्वारे पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांच्याकडे केली आहे.

संपूर्ण तालुक्यातून लोक इंदापूर येथे त्याठिकाणी चाचणीसाठी येत असल्याने त्या केंद्रावरही मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी जमू लागलेली आहे.त्यातून सोशल डिस्टन्सिंगचाही फज्जा उडतो. तसेच चाचणीसाठी सोबत गेलेल्या नागरिकांपैकी काहींचे रिपोर्ट पॉझिटिव्ह येतात. तर काहींचे निगेटिव्ह येतात. त्यातूनही संपर्क होऊन अनेक लोक पॉझिटिव्ह येतात. अशा प्रसंगी अनेक गंभीर प्रसंग घडतानाही दिसून येतात.

तसेच भिगवण परिसरातील रुग्ण पॉझिटिव्ह आल्यानंतर रुग्णवाहिकेमधून त्यांना पुन्हा भिगवण येथे आणून कोविड सेंटरला ऍडमिट केले जाते.या सर्व घटना टाळण्यासाठी आणि भिगवण शी परिसरातील जवळपास 20 पेक्षा अधिक गावांचा संपर्क असून नागरिकांना आपली चाचणी येथे तात्काळ करता येणे सोयीस्कर आहे. कोरोनासारख्या गंभीर आजारापासून बचाव करता यावा. यासाठी ही महत्वाची सोय व्हावी म्हणून भिगवण याठिकाणी हे सेंटर सुरू व्हावे अशी मागणी तेजस देवकाते यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *