भाजपचे सरकार असल्याने उन्मेष पाटील यांच्यावर माजी सैनिक मारहाण प्रकरणात एफआयआर दाखल झाला नाही, त्या प्रकरणाची पुन्हा तपासणी होणार – देशमुख

| मुंबई | फडणवीसांचे सरकार असताना सोनू महाजन या माजी अधिकाऱ्याला मारहाण झाली होती. त्याला ठार मारण्याचा प्रयत्न केला असेही आरोप झाले होते. त्याला भाजपच्या आमदाराने मारण्याचा प्रयत्न केला असेही म्हटले जात होते. जे सध्या खासदार आहेत. आता त्या प्रकरणाची चौकशी होणार असल्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितले आहे. यासंदर्भात अनिल देशमुख यांनी ट्विटरवर माहिती दिली.

गृहमंत्री म्हणाले की, २०१६ साली भाजपचे तत्कालिन आमदार व आताचे खासदार उन्मेष पाटील व इतरांनी माजी सैनिक सोनू महाजन यांच्यावर हल्ला केला होता. तेव्हाच्या भाजप सरकारने महाजन यांना न्याय दिला नाही. यासंदर्भात मला मिळालेल्या अनेक निवेदनांनुसार पोलिसांना उन्मेष पाटील यांची या संदर्भात चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. २०१६ साली हा गुन्हा घडला होता. पण तेव्हा भाजपचे सरकार असल्याने पाटील यांच्यावर एफआयआर दाखल झाला नाही. त्यानंतर २०१९ मध्ये उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर एफआयआर दाखल करण्यात आला. परंतु पुढे उन्मेष पाटील यांच्यावर कोणतीही कायदेशीर कारवाई झाली नसल्याचे देशमुखांनी म्हटले आहे.

दरम्यान, शिवसैनिकांनी केलेल्या मारहानीवरून भाजप सेनेवर टीका करत असताना, आता या प्रकरणामुळे भाजपचे सैनिक प्रेम असे बेगडी कसे, असे संदेश सोशल मीडियाच्या माध्यमातून पसरत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *