भारताचा पॉवर स्कोअर घसरला, कोरोनानाने होरपळून सुद्धा अमेकिरा पहिल्याच स्थानी..!

| दिल्ली | कोरोना या संसर्गजन्य रोगाचा फटका सर्वांनाच बसला. अनेक देश आर्थिक खाईत बुडालेले असताना जगभरातील शक्तिशाली देशांची यादी जाहीर झाली आहे. नेहमीप्रमाणे सर्वात शक्तिशाली देश म्हणून अमेरिका प्रथम क्रमाकांवर आहे. अमेरिकेला कोरोनाचा फटका बसूनही अमेरिकेने आपला पहिला क्रमांक सोडला नाही. धक्कादायक बाब म्हणजे २०१९ मध्ये भारताचा पॉवर स्कोअर ४१.० होता. तर, यावर्षी या गुणात घट झाली असून ३९.७ टक्के इतके झाले आहे. या यादीत झळकण्यासाठी पॉवर स्कोअर ४० हून अधिक असणे अपेक्षित असते. परिणामी भारत या यादीत पोहोचू न शकल्याने भारताला मोठा धक्का बसला आहे.

आंतरराष्ट्रीय स्तरावर असे मत व्यक्त केले जात आहे की, करोना संसर्गाचा भारताला फटका बसला म्हणून भारताचा पॉवर स्कोअर ४० हून कमी झाला. मागील वर्षी भारताचा समावेश या यादीत होता. भारताच्या स्थानात यावर्षी दोन अंकानी घसरण झाली आहे.

आशियातील सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या दुसऱ्या क्रमांकाचा देश या यादीतून बाहेर गेला आहे. भारताचा समावेश आता मध्यम शक्तिशाली देशांच्या यादीत करण्यात आला आहे. येत्या काही वर्षात भारताचा या यादीत पुन्हा समावेश होऊ शकतो. इंडो-पॅसिफिक भागातील देशांमध्ये भारताने कीरोनाच्या संसर्गामुळे विकास करण्याची क्षमता गमावली असल्याचे लोवी इन्स्टिट्यूटने सादर केलेल्या अहवालात म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *