मुख्यमंत्री आमचाच नंतर आता मुंबई आणि नशिकात देखील महापौर शिवसेनेचाच, संजय राऊतांचा नवा नारा..!

| नाशिक | आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महाविकास आघाडीने एकत्र लढण्याचा निर्णय घेतला आहे. शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत एकत्र लढविल्या गेल्या. त्यात चांगले यश मिळाले आहे. दरम्यान, आगामी नाशिक महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नव्याने रचना करावी लागत आहे. बदल करावे लागणार आहेत. तर मुंबई (Mumbai) आणि नाशिकचा (Nashik) आगामी महापौर (Mayor) शिवसेनेचाच ( Shiv Sena) असेल, असा विश्वास शिवसेना नेते प्रवक्ते संजय राऊत ( Sanjay Raut) यांनी येथे व्यक्त केला आहे.

नाशिक दौऱ्यावर राऊत आहेत. त्यावेळी त्यांनी भाष्य केले. राजकीय विरोधकांना त्रास देण्यासाठी केंद्र सरकार ईडीचा गैरवापर करत आहे, असा टोला त्यांनी लगावला. ईडी, सिबीआय यांनी भाजपचे कार्यकर्ते असल्यासारखं वागू नये. केंद्राला हवे तसे या संस्था काम करतात, त्यामुळे ईडी, सीबीआयची प्रतिमा मालिन होत आहे, असे ते म्हणाले. महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षाचा सन्मान राखून निवडणुका लढवू तर मुंबई आणि नाशिकमध्ये शिवसेनेचे महापौर निवडून येतील, असा विश्वासही त्यांनी बोलून दाखवला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *