माझा देवावर विश्वास नाही. म्हणजे मग अर्थातच भूत असो, सैतान असो यांच्यावरही विश्वास नाही. पण अलीकडे मात्र ५० टक्के विश्वास बसायला लागला..! याचा अर्थ मी देवावर ५० टक्के विश्वास ठेवायला लागलो असं नव्हे, तो तर नाहीच ! पण सैतानावर मात्र माझा १०० टक्के विश्वास बसायला लागला. आणि याचं सारं श्रेय भाजपला आहे ! सैतान अस्तित्वात असण्याच्या मला ज्या काही खुणा भाजपा संस्कृतीमध्ये जाणवल्या त्या खालील प्रमाणे..
• झेंडू आल्यासारखी रातोरात नोटाबंदी जाहीर केली. बँकासमोर शेकडो गरीब लोक मरण पावले, पण भाजपाच्या एकाही नेत्याला लाज वाटली नाही. कुणीही क्षमा मागितली नाही. उलट नंबर दोन वाल्यांना रांगेत उभे राहावे लागले, असे निर्लज्ज वक्तव्य केले.
• पुलावामामध्ये ४४ सैनिक शहीद झालेत. त्याची शरम वाटून राजीनामा देण्याऐवजी हे अट्टल लोक त्यांच्याच नावानं मतं मागत फिरत होते. जणू यांना आनंदाच्या उकळ्या फुटत होत्या, अशीच यांची वागणूक होती.
• पुलवामा मध्ये एवढे आर डी एक्स कुठून आले, याची चौकशी अजुन नाही. मात्र सुशांत सिंग या कलाकाराच्या मरणाची चौकशी करण्यासाठी लगेच सीबीआय कामाला लावली.
• चायना बॉर्डरवर २२ सैनिक शहीद झालेत आणि पंतप्रधान कपडे बदलण्यात, फोटो काढण्यात, नौटंकी करण्यात व्यस्त होते. यांच्या पैकी कुणीही साधा निषेध देखील केला नाही.
• कोरोना मुळे लॉक डाऊन अचानक जाहीर केले. लाखो लोकांना स्थलांतर करतांना हजारो किलोमीटर उन्हातान्हात, उपाशी पोटी चालावे लागले. शेकडो लोक, छोटी मुलं, रस्त्यावर मेले. पण यांना लाज वाटली नाही. कुणीही खंत व्यक्त केली नाही. उलट हे लोक आमदार खरेदी करणं, सरकार पाडणं असल्या धंद्यात गुंतले होते.
• महाराष्ट्रात कोरोना वाढत असताना सरकारला मदत करण्याऐवजी हे लोक अत्यंत गलिच्छ राजकारण करत होते. महाराष्ट्रातील जनतेने सी एम फंडात पैसे जमा करू नये, असे निर्लज्जपणे सांगत होते.
• कोरोना केसेस वाढत असतानाही हे लोक मुद्दाम परीक्षा घेतल्या जाव्या यासाठी बोंब मारत होते. विद्यार्थी मेले तरी यांना काहीही देणेघेणे नव्हते. फक्त यांना काहीही करून सरकारला बदनाम करायची संधी हवी होती.
• आणि आताही मंदिरं उघडा म्हणून हे लोक आंदोलन करत आहेत. वारी झालीच पाहिजे म्हणणाऱ्या फडणवीसांनी वारीला जाण्याची हिंमत मात्र दाखवली नाही.
• म्हणजे गरीब मेला पाहिजे, सैनिक मेले पाहिजे, वारकरी मेले पाहिजे, मजूर मेले पाहिजे आणि कसेही करून भाजपला सत्ता मात्र मिळाली पाहिजे. तुम्ही रस्त्यावर मरा, बँकेसमोर मरा, सीमेवर मरा, वारीत मरा किंवा मंदिरात मरा.. पण भाजपला सत्ता मिळवून द्या..! हाच यांचा एकमेव कार्यक्रम !
• आता मला प्रश्न पडतो, की..
असला नीच विचार सैतानाशिवाय दुसरं कुणी करू शकते का ?
• त्यामुळे निदान भारतात तरी सैतान अस्तित्वात आहे, यावर माझा ठाम विश्वास आहे.
– ज्ञानेश वाकुडकर, अध्यक्ष, लोकजागर अभियान, अतिथी संपादक