| नवी दिल्ली | देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ७० वा वाढदिवस भाजपकडून मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. मात्र दुसरीकडे सोशल मीडियावर मात्र वेगळेच ट्रेंड दिसत आहे. रात्री पासून #HappyBdayNaMo, #PrimeMinister #NarendraModiBirthday आणि #NarendraModi ट्रेंड होत आहे. मात्र यात एक ट्रेंड सर्वात टॉपला आहे तो म्हणजे #NationalUnemploymentDay आणि #राष्ट्रीय_बेरोजगार_दिवस.
पंतप्रधान मोदींच्या वाढदिवशीच हा ट्रेंड अचानक ट्विटरवर सुरु झाला आहे. सोशल मीडियावरून तरुणाई त्यांचा संताप अशा पद्धतीनं व्यक्त करताना दिसत आहे. सध्या भारतात कोरोनाचे संकट आहे. आधीच डबघाईला आलेली भारताची अर्थव्यवस्था आणखी अडचणीत सापडली आहे. बेरोजगारीचं प्रमाण वाढल्यानं तरुणांसमोर अनेक प्रश्न निर्माण झाले आहे. एनएसओच्या अहवालानुसार भारताच्या जीडीपीत २३.९ टक्क्यांची घसरण नोंदवली होती. जी गेल्या ४० वर्षातील सर्वात मोठी घसरण आहे. एवढंच नाही तर शहरातील बेरोजगारीचा दरही ८.३२ टक्क्यांवर पोहोचला आहे.
बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली असलेल्या भारतातील तरुणांनी आता त्यांची नाराजी सोशल मीडियावरून व्यक्त करण्यास सुरुवात केली आहे. गेल्या काही आठवड्यात सोशल मीडियावर असे अनेक ट्रेंड सोशल मीडियावर आले होते.
दरम्यान या पूर्वी ९ सप्टेंबरला देशातील अनेक भागात तरुणांनी रात्री ९ वाजून ९ मिनिटांनी बॅटरी, मोबाइल फ्लॅश आणि दिवे लावून त्यांचा विऱोध दर्शवला होता. याच मोहिमेनंतर आता मोदींच्या वाढदिवसाला अनेक विद्यार्थी संघटनांनी १७ सप्टेंबरला #राष्ट्रीय_बेरोजगार_दिवस ट्रेंड सुरु केला. यामागे काँग्रेसचा हात असल्याचा आरोप भाजपच्या आयटीसेलने केला आहे
- जळगावात तरुणीची अत्याचार करून हत्या
- तिहेरी हत्याकांडाने हादरला रायगड जिल्हा…एकाच कुटुंबातील तिघांची निर्घृण हत्या
7 महिन्याच्या गर्भवती महिलेच्या हत्येने हुतात्म्यांची भूमी सुन्न.. - महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना ठाणे महापालिका जिल्हा कार्यकारिणी स्थापन
राज्य कोषाध्यक्ष श्री अरुण बडे आणि ठाणे जिल्ह्या अध्यक्ष अरुण कराळे यांच्या निरीक्षणात पार पडली सभा - मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील सी.सी टीव्हीसाठीचे मध्यवर्ती शाळा नियंत्रण कक्षाचे दूरदूरश्यप्रणालीद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण संपन्न
*मिरा-भाईंदर महानगरपालिकेचे अनुकरण इतर महानगरपालिकांनीही करावे – मुख्यमंत्री - कार्यसम्राट दमदार आमदार महेंद्रशेठ थोरवे ६०००० च्या मताधिक्याने विधानसभेवर जाणार…पालकमंत्री उदयजी सामंत यांचे प्रतिपादन .
महाआघाडी सह मनसेलाही खिंडार…आमदार थोरवेंचा जलवा कायम .