मध्यमवर्गीय कुटुंबातील माझ्यासारख्या महिला मेल्या तरी चालतील असे भेदभावाचे धोरण नाही ना केंद्राचे – तृप्ती देसाई

| मुंबई | सध्या महाराष्ट्रात कंगना राणावत आपला पॉलिटिकल अजेंडा रेटत आहे. तिने मुंबई आणि मुंबई पोलिसांबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे कंगणा आणि सेनेमध्ये संघर्ष पेटला आहे. मुंबई ९ सप्टेंबरला कंगणा मुंबईत येणार होती. या पार्श्वभूमीवर कंगणाला केंद्र सरकारने वाय प्लस दर्जाची सुरक्षा दिली होती. अशातच कंगणाला सुरक्षा दिलीत मग मला का नाही, असा सवाल भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी केला आहे.

महिलांसाठी लढताना माझ्यावर अनेकवेळा हल्ले झाले आहेत. आंदोलनात लढताना कित्येकवेळा मी मरणाच्या दारातून आले आहे. मला कोणतीही सुरक्षा देण्यात आली नाही ना माझी विचारणा करण्यात आली नाही. माझी कित्येक आंदोलन राष्ट्रीय पातळीवर गाजली होती आणि यशस्वीही झाली होती. मी माझ्या जिवाला धोका असल्याचा असा पत्रव्यवहार राज्य सरकार आणि केंद्र सरकारला अनेक वेळा लेखी पत्राद्वारे केला असल्याचं तृप्ती देसाईं यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, मुंबईतील हाजी अली दर्ग्यातील आंदोलन, शनिशिंगणापूरमध्ये महिलांच्या समानतेसाठी लढताना माझ्यावर नाशिकला हल्ला झाला होता. त्यासोबत केरळला दोन वेळा माझ्यावर हल्ला झाला होता आणि त्यावेळी मला केरळहून सातशेपेक्षा जास्त फोन आले असल्याचं तृप्ती देसाईंनी सांगितलं आहे.

कंगनाला सुरक्षा दिली अभिनंदनीय बाब आहे परंतु महिलांच्या अधिकारासाठी रस्त्यावर लढणाऱ्या मध्यमवर्गीय कुटुंबातील माझ्यासारख्या महिला मेल्या तरी चालतील असे भेदभावाचे धोरण तर नाहीना केंद्र सरकारचं, असा सवालही देसाई यांनी केला केंद्राला केला आहे. त्यासोबतच हे लिहिण्याचे कारण एकच, कारण माझा कधीही खून होऊ शकतो, असं देसाईंनी म्हटलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *