मुंबईतील कार्यालयांच्या वेळा बदला, प्रवासी संघटनेची मागणी..!

| मुंबई | लोकलमधील गर्दी कमी व्हावी तसेच दिवसेंदिवस वाढत जाणारा कोरोना व्हायरसचा त्रास कमी व्हावा यासाठी मुंबईतील ऑफिसेसच्या वेळांमध्ये बदल करण्यात यावा, अशी मागणी उपनगरीय प्रवाशी वाहतूक संघाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. सध्या सर्वसामान्यांना लोकलने प्रवास करता येतं नाही. परंतु, लवकरच सर्वांसाठी लोकल सेवा सुरू झाल्यास पुन्हा कोरोनाचे रुग्ण वाढण्याची शक्यता दाट आहे. त्यामुळे लोकल सुरू करण्यापूर्वी प्रशासनाने मुंबईतील ऑफीसेसच्या वेळा बदलाव्यात. यामुळे गर्दी कमी होण्यास मदत होईल आणि कोरोनाचा वाढत जाणारा प्रादुर्भाव थांबेल.

यासोबतच ऑफिसच्या वेळा गाठण्यासाठी नोकरदारांची होणारी दमछाक देखील थांबेल, अशी प्रतिक्रिया रेल्वे प्रवासी संघाचे माजी अध्यक्ष मनोहर शेलार यांनी दिली आहे. याबाबत त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी पत्रव्यवहार देखील केला आहे. जर मागणी मान्य नाही झाली तर निर्माण होणाऱ्या परिस्थितीला प्रशासन जबाबदार असेल असं देखील मनोहर शेलार यांनी म्हंटल आहे. मागणी मान्य न झाल्यास आम्ही मंत्रालयासमोर घंटा नाद आंदोलन करू आसा इशारा संघाने दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *