मुंबईत येणाऱ्यांना १४ दिवसांचे क्वारांटाईन अनिवार्य; सरकारी कर्मचारी यांना मात्र परवानगीने सूट..!

| मुंबई | मुंबईत येणा-या नागरिकासांठी मुंबई महानगर पालिकेने आता नवे आदेश काढले आहेत. मुंबईत येणा-या स्थानिक नागरिकांना परत आल्यानंतर १४ दिवस घरातच राहावे लागणार आहे. मुंबई महानगरपालिकेने (बीएमसी) हे नवे आदेश काढले आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून हे आदेश काढण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. मुंबईतल्या रुग्णांची वाढती संख्या आणि संभाव्य धोका टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे महापालिकेने म्हटलं आहे.

ज्या शासकीय अधिका-यांना मुंबईत आल्यानंतर कामानिमित्त बाहेर पडायचे असेल तर त्यांना परवानगी घ्यावी लागणार आहे. कोरोनाचा प्रसार आणि धोका टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

गेल्या काही महिन्यांमध्ये कोरोनाच्या साथीमुळे मुंबईतून मोठ्या प्रमाणावर लोक आपल्या गावी परतले आहेत. आता काही लोक पुन्हा परत येत असल्याने महापालिकेने या गाईड लाईन्स जाहीर केल्या आहेत.

दरम्यान, गेल्या काही महिन्यांपासून बंद पडलेल्या शाळा आता पुन्हा सुरु होण्याची शक्यता आहे. केंद्र सरकार त्यावर गांभिर्याने विचार करत आहे. १ सप्टेंबरपासून टप्प्याटप्प्याने या शाळा सुरु होणार आहेत. केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी एका बैठकीत या प्रस्तावावर विचार सुरु असल्याचे संकेत दिले. अनलॉक-३ची मुदत ३१ ऑगस्टला संपणार आहे. त्यानंतर नव्या गाईड लाईन्समध्ये यासंबंधी घोषणा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *