| मुंबई | महाराष्ट्र भूषण पुरस्कार निवड समितीची पुनर्रचना करण्यात आली असून सांस्कृतिक कार्य विभागाने याबाबत नुकताच शासन निर्णय निर्गमित केला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे या समितीचे अध्यक्ष तर उपमुख्यमंत्री अजित पवार हे समितीचे उपाध्यक्ष असतील.
सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख, सांस्कृतिक कार्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर, सांस्कृतिक कार्य सचिव आणि सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक हे या समितीत शासकीय सदस्य म्हणून काम पाहतील.
शास्त्रज्ञ डॉ.अनिल काकोडकर, सामाजिक कार्यकर्ते डॉ. प्रकाश आमटे, उद्योजक बाबा कल्याणी, क्रिकेटर संदिप पाटील आणि अभिनेते दिलीप प्रभावळकर अशासकीय सदस्य म्हणून या समितीत असणार आहेत.
महाराष्ट्र भूषण पुरस्कार निवड समिती शासन निर्णयाच्या दिनांकापासून पुढील तीन वर्षे कालावधीसाठी किंवा समितीची पुनर्रचना यापैकी जे अगोदर होईल तोपर्यंत कार्यरत असेल.
- जळगावात तरुणीची अत्याचार करून हत्या
- तिहेरी हत्याकांडाने हादरला रायगड जिल्हा…एकाच कुटुंबातील तिघांची निर्घृण हत्या
7 महिन्याच्या गर्भवती महिलेच्या हत्येने हुतात्म्यांची भूमी सुन्न.. - महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना ठाणे महापालिका जिल्हा कार्यकारिणी स्थापन
राज्य कोषाध्यक्ष श्री अरुण बडे आणि ठाणे जिल्ह्या अध्यक्ष अरुण कराळे यांच्या निरीक्षणात पार पडली सभा - मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील सी.सी टीव्हीसाठीचे मध्यवर्ती शाळा नियंत्रण कक्षाचे दूरदूरश्यप्रणालीद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण संपन्न
*मिरा-भाईंदर महानगरपालिकेचे अनुकरण इतर महानगरपालिकांनीही करावे – मुख्यमंत्री - कार्यसम्राट दमदार आमदार महेंद्रशेठ थोरवे ६०००० च्या मताधिक्याने विधानसभेवर जाणार…पालकमंत्री उदयजी सामंत यांचे प्रतिपादन .
महाआघाडी सह मनसेलाही खिंडार…आमदार थोरवेंचा जलवा कायम .