महाराष्ट्र राज्य जूनी पेन्शन हक्क संघटनेच्या पाठिंब्याने पुणे शिक्षक मतदारसंघातून आमदार दत्तात्रय सावंत यांचे पारडे जड !

| पुणे : विनायक शिंदे | विधान परिषदेच्या पुणे शिक्षक मतदारसंघासाठी महाराष्ट्र राज्य जूनी पेन्शन संघटनेने अपक्ष उमेदवार आमदार दत्तात्रय सावंत यांना पाठींबा जाहीर केला आहे, यामुळे शिक्षक मतदारसंघामध्ये आमदार सावंत यांचे पारडे जड झाल्याचे दिसत आहे. २०१४ मध्ये अपक्ष म्हणून निवडून आलेल्या आमदार दत्तात्रय सावंत यांनी विधिमंडळात विविध कार्यक्रमांमध्ये, आंदोलन, मोर्चा द्वारे शिक्षकांचे प्रश्न मांडले आहेत, त्यासाठी आवाज उठवला होता.

१ डिसेंबर रोजी होणाऱ्या विधान परिषदेच्या निवडणूकीसाठी आमदार सावंत यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केली आहे. महाराष्ट्र राज्य शाळा कृती समितीच्या माध्यमातून आमदार सावंत खाजगी अनुदानित, विना अनुदानित शाळातील शिक्षकांसाठी कार्यरत आहेत.

१ नोव्हेंबर २००५ नंतरच्या कर्मचाऱ्यांना जूनी पेन्शन लागू व्हावी यासाठी महाराष्ट्र राज्य जूनी पेन्शन हक्क संघटनने आयोजित केलेल्या विविध मोर्चा, आंदोलनात आमदार दत्तात्रय सावंत यांनी सक्रीय सहभाग घेतला आहे. सभागृहामध्ये जूनी पेन्शन मुद्दावर अनेक वेळा प्रश्न उपस्थित केले आहेत.

त्यांना अनेक संघटनानी आपला पाठिंबा जाहीर केला आहे. त्यातच नुकताच महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटना या महाराष्ट्रतील सर्वात मोठया सरकारी/निमसरकारी कर्मचारी संघटनेने देखील आपला पाठिंबा आमदार दत्तात्रय सावंत यांच्यामागे उभा केला आहे. महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटनेने पाठिंबा दिल्याने आमदार दत्तात्रय सावंत यांचे पारडे जड मानले जात आहे.

“जुन्या पेन्शन योजनेचा लढा पुढे नेण्यासाठी आमदार दत्तात्रय सावंत हा प्रश्न सभागृहात लावून धरतील आणि सोडविण्यासाठी प्रयत्नशील असतील असा विश्वास आम्हाला आहे. या पूर्वी देखील आम्ही “नागपूर पदवीधर मतदारसंघातून महाविकास आघाडीचे अभिजीत वंजारी , अमरावती विभागातून शेखर भोयर यांना पाठिंबा जाहीर केला आहे, असे महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटनेच्या निवडणूक प्रभारी सौ. गीता वितेश खांडेकर यांनी दैनिक लोकशक्तीशी बोलताना सांगितले आहे. तसेच लवकरच इतर शिक्षक व पदवीधर मतदार संघाबाबत निर्णय जाहीर केला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *