महाविद्यालयीन शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांना लोकलने प्रवासाची मुभा द्यावी – आमदार डॉ. मनीषा कायंदे

| मुंबई | उच्च व तंत्रशिक्षण विभागाने राज्यातील विद्यापीठे व त्यांच्याशी संलग्न असलेल्या महाविद्यालयातील १०० टक्के शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना कार्यालयात उपस्थित राहण्याचे आदेश दिले आहेत. मात्र मुंबई व जवळच्या उपनगरात राहणाऱ्या कर्मचाऱ्यांना कामाच्या ठिकाणी पोहोचण्यास तारेवरची कसरत करावी लागणार आहे. त्यामुळे महाविद्यालयीन प्राध्यापक व इतर कर्मचाऱ्यांना अत्यावश्यक सेवेचा दर्जा देऊन त्यांना रेल्वेने प्रवास करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी आमदार डॉ मनीषा कायंदे यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसेच उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्याकडे केली आहे.

अंतिम वर्षाच्या परीक्षा १ ते ३१ ऑक्टोबर दरम्यान घेतल्या जाणार आहेत. त्या दृष्टीने नियोजनासाठी सर्व कर्मचारी यांना कामावर उपस्थित राहण्याचे आदेश शासनाने दिले आहेत. त्यामुळे या सर्व संबंधित अधिकारी कर्मचारी यांना लोकल ने प्रवास करण्याची मुभा देण्यात यावी, असे डॉ. मनीषा कायंदे यांनी म्हंटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *