येऊरमधील आदिवासी बांधवांची ग्रँड मराठा फाऊंडेशनने केली आरोग्य तपासणी…

| ठाणे | कोरोना काळात प्रत्येकजण आपल्या आरोग्याबाबत सजग झाला आहे. मात्र सद्यस्थितीमध्ये आदिवासी घटकाची कुचंबणाच होत आहे. ही अडचण ओळखून ग्रँड मराठा फाऊंडेशनने येऊरमधील आदिवासी बांधवांची आरोग्य तपासणी करुन त्यांना औषधे, सॅनिटायझर, साबण, मास्क आणि इतर आरोग्यवर्धक साहित्याचे वाटप केले. येऊर येथील सुमारे 500 आदिवासींचा रक्तदाब, शरीरातील ऑक्सीजन पातळी, ताप आदींची तपासणी या फाऊंडेशनच्या वतीने संस्थापक रोहित शेलाटकर व त्यांचा मातोश्री विश्वस्त माधवीताई शेलाटकर यांच्या मार्गदशनाख़ाली व प्रमुख अतिथी श्री राजेश तावडे यांच्या उपस्थित संपन्न झाले.

यावेळी आदिवासी बांधवांना वैयक्तीक स्वच्छता पाळता यावी यासाठी सॅनिटायझर, साबण, मास्क या सह विविध आजारांवरील औषधांचे वाटपही करण्यात आले. या कार्यक्रमाला वैद्यकीय पथकासह अतिथी म्हणून हेमंत जाधव, मोहन देसाई, संजय ठाकुर, अमरेन्द्र तिवारी आदी उपस्थित होते. दरम्यान सदर शिबीर मितेश प्र देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *