| नवी दिल्ली | रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने २४ तासांमध्ये दोन बँकेवर निर्बंध घातले आहेत. लक्ष्मी विलास बँकेनंतर आता जालना जिल्ह्यामधील मंठा अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेवर निर्बंध घालण्यात आले आहे. सहा महिन्यांसाठी हे निर्बंध असल्याची माहिती आरबीआयने दिली आहे.
माहितीनुसार, नवीन ठेवी स्विकारण्यावरही बँकेवर निर्बंध असणार आहेत. कोणालाही कर्ज देऊ शकत नाही किंवा बँक कर्ज घेऊही शकत नाही. तसेच जुन्या कर्जांमध्ये नूतनीकरण करण्यासाठी बँक कुठलीही नवी गुंतवणूक करू शकत नाही. हे निर्बंध सहा महिन्यांसाठी असणार आहेत.
केंद्र सरकारने मंगळवारी लक्ष्मीविलास खासगी क्षेत्रातील बँकेवर काही निर्बंध लादले आहेत. सरकारच्या निर्बंधांमुळे आता बँकेच्या खातेदारांना दररोज २५ हजार इतकीच रक्कम काढता येणार आहे. हे निर्बंध १६ डिसेंबरपर्यंत लागू राहतील. अर्थ मंत्रालयातर्फे याबाबतची माहिती देण्यात आली आहे. केंद्र सरकारने आरबीआयच्या सल्ल्याने लक्ष्मी विलास बँकेबाबत ही कारवाई केली आहे. प्राप्त माहितीनुसार बँकेची आर्थिक स्थिती दिवसेंदिवस ढासळत चालल्याचे आढळून आले होते.
- जळगावात तरुणीची अत्याचार करून हत्या
- तिहेरी हत्याकांडाने हादरला रायगड जिल्हा…एकाच कुटुंबातील तिघांची निर्घृण हत्या
7 महिन्याच्या गर्भवती महिलेच्या हत्येने हुतात्म्यांची भूमी सुन्न.. - महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना ठाणे महापालिका जिल्हा कार्यकारिणी स्थापन
राज्य कोषाध्यक्ष श्री अरुण बडे आणि ठाणे जिल्ह्या अध्यक्ष अरुण कराळे यांच्या निरीक्षणात पार पडली सभा - मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील सी.सी टीव्हीसाठीचे मध्यवर्ती शाळा नियंत्रण कक्षाचे दूरदूरश्यप्रणालीद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण संपन्न
*मिरा-भाईंदर महानगरपालिकेचे अनुकरण इतर महानगरपालिकांनीही करावे – मुख्यमंत्री - कार्यसम्राट दमदार आमदार महेंद्रशेठ थोरवे ६०००० च्या मताधिक्याने विधानसभेवर जाणार…पालकमंत्री उदयजी सामंत यांचे प्रतिपादन .
महाआघाडी सह मनसेलाही खिंडार…आमदार थोरवेंचा जलवा कायम .