या देशाच्या संसदेत चीन विरोधात भारताच्या बाजूने ठराव..

| नवी दिल्ली | लडाखमधील नियंत्रण रेषेवर झालेल्या संघर्षानंतर भारताने चीनविरोधात दाखवलेल्या आक्रमकतेचं अमेरिकेने कौतुक केलं आहे. अमेरिकेतील संसदेत दोन शक्तिशाली सिनेटर्स ग्रुपकडून चीनच्या आक्रमकतेचा निषेध करणारा ठराव सादर करण्यात आला. चीनकडून नियंत्रण रेषा बदलण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा उल्लेख ठरावात करण्यात आला आहे. पीटीआयने यासंबंधी माहिती दिलं आहे.

चिनी सैन्यांकडून भारतीय सैन्यांविरोधात घेतली जाणारी भूमिका, लष्कर पाठवण्याच्या घटना तसंच पायाभूत सुविधा निर्माण केल्या जात असल्याच्या पार्श्वभूमीवर बुहमत असणाऱ्या रिपब्लिकन पक्षाचे सिनेटर जॉन कोर्निन आणि सिनेटच्या गुप्तचर निवड समितीचे सदस्य मार्क वॉर्नर यांनी हा ठराव सादर केला. जॉन कोर्निन आणि मार्क वॉर्नर सिनेट इंडिया कॉकसचेही सह-प्रमुख आहेत.

“सिनेट इंडिया कॉकसचा सह-संस्थापक या नात्याने भारत आणि अमेरिकेमधील दृढ संबंध किती महत्त्वाचे आहेत याची मला जाणीव आहे,” असं जॉन कोर्निन यांनी सांगितलं. “मी चिनविरोधात भूमिका घेण्याच्या तसंच इंडो-पॅसिफिक क्षेत्र स्वतंत्र राहण्यासाठी भारताने दाखवलेल्या कटिबद्धतेची प्रशंसा करतो,” असंही ते म्हणाले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *