राज्यातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी सहकारी पतपेढी क्रेडिट सोसायटी सभासदांना दिवाळीपूर्वी मिळणार लाभांशाची रक्कम, महाराष्ट्र पुरोगामी शिक्षक संघटनेच्या पाठपुराव्याला मिळाले यश..

| मुंबई | २०१९-२० ची वार्षिक सभा न होता दिवाळीपूर्वी राज्यातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना लाभांश रक्कम मिळावी यासाठी दिनांक ७ ऑगस्ट २०२० पासून सतत महाराष्ट्र पुरोगामी शिक्षक संघटना मुंबई चा पाठपुरावा सुरू होता.

सहकार व पणन विभाग मंत्री मा.श्री. बाळासाहेब पाटील, सहकार विभाग राज्यमंत्री मा.श्री विश्वजित कदम, कोकण विभाग शिक्षक आमदार श्री बाळाराम पाटील, सहकार आयुक्त मा.श्री.अनिल कवडे, मा.अप्पर निबंधक, पुणे यांना मागणी निवेदन पाठवून कोरोना संक्रमण काळ लक्षात घेता वार्षिक सभा न घेता लाभांश सभासद सदस्यांना वितरित करण्याचा अधिकार संचालक मंडळांना देण्यात यावा, ही मागणी केल्याचे कार्याध्यक्ष व कनिष्ठ महाविद्यालय विभाग प्रमुख श्री.सतीश ठाकरे यांनी सांगितले.

बुधवार दिनांक १४ ऑक्टोबर २०२० रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत वार्षिक सभा न घेता लाभांश वितरित करण्याचा अधिकार शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी सहकारी पतपेढी क्रेडिट सोसायटी संचालक मंडळांना देण्यात आला. महाराष्ट्र पुरोगामी शिक्षक संघटना मुंबई च्या पाठपुराव्याला यश प्राप्त झाले. दिनांक ०२.११.२०२० रोजी मा.राज्यपालांनी चालू वर्षी सहकार कायद्यात सुधारणा करून संचालक मंडळाचा निर्णय घेऊन लाभांश वाटपाची परवानगी दिलेली आहे. त्यानुसार दिवाळी सणापुर्वी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना लाभांश मिळणार असून मुंबईतील शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यावर लाभांश जमा करण्यात येणार असून, काही जिल्ह्यात रोखीने लाभांश मिळणार असल्याची माहिती मुंबई अध्यक्ष श्री.तानाजी कांबळे यांनी यावेळी दिली.

वार्षिक सभा न घेता दिवाळीपूर्वी राज्यातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी सभासद सदस्यांना लभांशं देण्याची महाराष्ट्र पुरोगामी शिक्षक संघटना मुंबई ची मागणी अखेर मान्य झालेली असून प्रामाणिक पाठपुराव्याला यश प्राप्त झालेले आहे. यासाठी कोकण विभाग शिक्षक आमदार माननीय श्री बाळाराम पाटील यांचे मोलाचे सहकार्य लाभले, त्याबद्दल महाराष्ट्र पुरोगामी शिक्षक संघटना मुंबई आणि सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांतर्फे माननीय बाळाराम पाटील सरांचे आभार मानण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *