
| इंदापूर / महादेव बंडगर | दि.14 सप्टेंबर रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे झालेल्या मदनवाडी तलावाच्या सांडावा फुटीची व शेतकऱ्यांच्या नुकसानीची पाहणी शुक्रवारी (दि. 16 सप्टेंबर) महाराष्ट्र राज्याचे सामान्य प्रशासन राज्यमंत्री दत्तामामा भरणे आणि बारामती लोकसभा मतदार संघाच्या खासदार सौ. सुप्रिया ताई सुळे यांनी केली.
मदनवाडी तलावाला भेट देऊन सांडाव्याची व त्यामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी केली. तसेच शेतकऱ्यांच्या शेतामध्ये जाऊन शेतकऱ्यांना धीर देत तुमच्या झालेल्या नुकसानी बद्दल शासनाच्या वतीने निश्चितच योग्य ती भरपाई दिली जाईल. याबाबत उपमुख्यमंत्री आदरणीय दादांच्या समवेत योग्य ती चर्चा करून वाढती महागाई, पिकांसाठी होणारा इतर सर्व खर्च लक्षात घेता योग्य ती मदत शेतकऱ्यांना कशी मिळेल यासाठी निश्चित प्रयत्नशील असल्याची ग्वाही त्यांनी ग्रामस्थांना दिली.
याप्रसंगी त्यांच्यासमवेत पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन रमेशआप्पा थोरात, प्रदीपदादा गारटकर, जिल्हा परिषद सदस्य हनुमंतनाना बंडगर, प्रतापआबा पाटील, अभिजित तांबिले, तुकाराम बंडगर, विष्णुपंत देवकाते, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी भारत शेडगे, तहसीलदार सोनाली मेटकरी, सर्व विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
- नकळत सारे घडते..!
- मैं अपनी फेव्हरेट हूँ..!
- “पडळकर हुल्लडबाजी करतात, त्यांना त्यांची औकात दाखवून देवू.!” भाजपच्या युतीतील राष्ट्रीय समाज पक्षाचा भाजपच्या पडळकरांवर हल्लाबोल..!
- २०१८ ते २०२१ पर्यंतचे ‘कोमसाप’चे वाङ्मयीन-वाङ्मयेतर पुरस्कार जाहीर..!
- पारनेर तालुक्यातील गारगुंडी गावात होणार ‘भिर्रर.. भिर्रर !’, १ जून रोजी संपन्न होणार बैलगाड्यांच्या भव्य शर्यती..!