| पुणे | शिव स्वराज्य भूमी भोर च्या राजकारण, समाजकारण, सहकार, शैक्षणिक जडणघडणीत सिंहाचा वाटा असणारे समाजभूषण स्वर्गीय रामनाना सोनवणे यांचे पुणे येथे राहत्या घरी हृदय विकाराने निधन झाले. स्वातंत्र्य पूर्व काळात उच्च शिक्षणाची कास धरत आपल्या गुणवत्तेच समजाच्या सर्वांगीण विकासात योगदान ठरावे म्हणून ग्रामपंचायत सरपंच ,पंचायत समिती सदस्य, मा,आमदार काकासाहेब भेलके, मा. आमदार संपतराव जेधे, नामदार अनंतराव थोपटे, याचे निकटवर्तीय म्हणून या सर्व पदांच्या माध्यमातून गाव व तालुक्याच्या उन्नती साठी भरीव कार्य केले आहे. वडावडीलापासूनच वारकरी संप्रदायाचे विचार अंगोअंग मुरले होते. संत तुकारामांचा आदर्श घेत आबांनी म्हणजे नानांच्या आजोबांनी त्यावेळच्या लोकांना सावकारी न करता घरी बोलावून लोकांना तयांचया जमिनी परत केल्या हेंच त्यांचे मोठेपण, तीच समाज सेवेची धुरा नानांनी समर्थपणे पेलली.
पुणे जिल्हा सहकारी बँक संचालक, विभागीय अधिकारी, म्हणून सहकार क्षेत्रात आपल्या कार्यकर्तृत्वा मोहर उमटवली.भोर मधील नामांकित राजा रघुनाथ राव एज्युकेशन सोसायटी मा. अध्यक्ष व विद्यमान संचालक म्हणून शिक्षण क्षेत्रातील नानाचे योगदान अजरामर असेच आहे. छोट्या मोठया प्रत्येक सामाजिक कार्यक्रमांत नानाची उपस्थीत कार्यक्रमास वेगळीच शोभा प्राप्त करून देत असे. कोणाच्याही व्यक्तिगत सुख दुःखात ज्येष्ठत्वाच्या नात्याने सांत्वन करण्यासाठी सर्वप्रथम नाना हजर असायचे.
समाजकारण, राजकारण, शिक्षण, सहकार, उद्योग, शेती यासर्वच क्षेत्रात लीलया संचार करणारे रामनाना हे संगीताचे अत्यंत जाणकार रसिक होते. शास्त्रीय, उपशास्त्रीय, सुगम, भजन संगीत यांचे श्रवण, गायन व चिंतन हा त्यांचा जिव्हाळ्याचा विषय. कलेला भरभरुन दाद देणारा, अनेक कलाकारांचां राजाश्रय असणारा रसिक मनाचा लोकनेता आज हरपला अशी भावना संगीत आचार्य प्रा. गणेश महाराज भगत यांनी व्यक्त केली.
त्यांचा समाज कारणाचा वारसा त्याचे चिरंजीव, भोर तालुका कोग्रेस अध्यक्ष शैलेश दादा सोनवणे समर्थ पणें जोपासत आहेत, कन्या माजी नगराध्यक्ष जयश्री ताई सोनवणे – शिंदे या राजकीय क्षेत्रातील , तर सुपुत्र प्रमोद सोनवणे यांनी उद्योजकतेची कास धरत नानाचां आदर्श समृध्द करत आहेत.जेष्ठ स्नुषा, डॉ अरुंधती सोनवणे प्रथितयश डॉकटर आहेत तर जावई श्री राजकुमार शिंदे उत्तम बिल्डर म्हणून नामांकित आहेत. नाती ईश्वरी सोनवणे, शर्वरी, उदयन, रणजीत आणि सागर ई, नातवंडे अशा संपन्न परिवाराचा नाना हेच आधारवड होते. स्नुषा पल्लवी सोनवणे या शैक्षणिक तर नातू बाल कलाकार स्वराज सोनवणे हा त्यांच्या संगीताची परंपरा निष्ठेने जोपासत आहे.
आदर्श पिता, समाज रत्न, उत्तम मार्गदर्शक, अशा अनेक पुरस्कारांनी नानांना गौरविण्यात आले होते.सर्वच क्षेत्रातील मान्यवरांकडून नाना ना श्रद्धांजली अर्पण करण्यात येत आहे..
- जळगावात तरुणीची अत्याचार करून हत्या
- तिहेरी हत्याकांडाने हादरला रायगड जिल्हा…एकाच कुटुंबातील तिघांची निर्घृण हत्या
7 महिन्याच्या गर्भवती महिलेच्या हत्येने हुतात्म्यांची भूमी सुन्न.. - महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना ठाणे महापालिका जिल्हा कार्यकारिणी स्थापन
राज्य कोषाध्यक्ष श्री अरुण बडे आणि ठाणे जिल्ह्या अध्यक्ष अरुण कराळे यांच्या निरीक्षणात पार पडली सभा - मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील सी.सी टीव्हीसाठीचे मध्यवर्ती शाळा नियंत्रण कक्षाचे दूरदूरश्यप्रणालीद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण संपन्न
*मिरा-भाईंदर महानगरपालिकेचे अनुकरण इतर महानगरपालिकांनीही करावे – मुख्यमंत्री - कार्यसम्राट दमदार आमदार महेंद्रशेठ थोरवे ६०००० च्या मताधिक्याने विधानसभेवर जाणार…पालकमंत्री उदयजी सामंत यांचे प्रतिपादन .
महाआघाडी सह मनसेलाही खिंडार…आमदार थोरवेंचा जलवा कायम .