र. ग. कर्णिक यांना पद्य पुरस्कार मिळावा, सरकारी कर्मचारी संघटनेची मागणी..!

| मुंबई | जगातील सर्वात मोठया लोकशाही गणराज्यतील आपण आज ७४ वा स्वातंत्र्य दिन साजरा करत आहोत. दरम्यान सध्या आदित्य ठाकरे यांच्याकडे पद्य पुरस्कार समितीची धुरा सोपवण्यात आली आहे. त्या समितीची बैठक देखील नुकतीच पार पडली. त्या अनुषंगाने आज स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने बृहन्मंबई राज्य सरकारी कर्मचारी संघटनेकडून ज्येष्ठ नेते र. ग. कर्णिक यांना पद्य पुरस्कार मिळावा , अशी मागणी केली जात आहे.

भारतीय स्वातंत्र्यलढ्यात लोकसेना या युवा संघटनेत हिरीरीने सहभागी झालेल्या, सरकारी सेवा हिच देशसेवा हा मूलमंत्र लाखो राज्यसरकारी कर्मचाऱ्यांना देणाऱ्या, राज्य आणि राष्ट्रीय आपत्तीत सर्व कर्मचाऱ्यांसह शासनाला सर्वोतोपरी सहाय्य करणाऱ्या, महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीपासून आजतागायत राज्य सर्व क्षेत्रात अग्रेसर ठेवण्यासाठी संघटनेच्या माध्यमातून अहोरात्र झटणाऱ्या, आदिवासी विकासाची गंगोत्री भगिरथ प्रयत्नांनी त्या दीन- दुबळ्यांपर्यंत पोहचवणाऱ्या, असंख्य बारबाला, ट्रक ड्रायव्हर, हाॅटेल बाॅईज यांचे एड्स या भयंकर रोगाबाबत प्रशिक्षण देण्याचा वसा घेतलेल्या, मुकी बिचारी कुणीही हाका अशा सरकारी कर्मचाऱ्यांना संघटनेच्या एकजूटीने आजवरच्या सर्व २३ मुख्यमंत्र्यांसमोर ताठ उभे करणाऱ्या, राज्यातील सर्व प्रमुख ३२ कामगार संघटनांची एकजूट बांधणाऱ्या, अखिल भारतातील लक्षावधी सरकारी कर्मचाऱ्यांचे तीन दशके कुशलतेने नेतृत्व करणाऱ्या, सद्यस्थितीत देशभरातील सर्वात अनुभवी आणि आदरणीय नेतृत्व रा. ग. कर्णिक यांना देण्यात यावे , ही मागणी मध्यवर्ती संघटनेसह राज्य आणि देशातील सर्व प्रमुख कामगार संघटनांनी करावी अशी आग्रहाची विनंती या ७४व्या स्वातंत्र्यदिनी करीत आहोत, अश्या आशयाचे संदेश देखील सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हायरल होत आहे.

यासंदर्भात बृहन्मुंबई राज्य सरकारी कर्मचारी संघटनेचे सरचिटणीस अविनाश दौंड यांच्याशी दैनिक लोकशक्ती ने संपर्क साधला असता, मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री अनिल देशमुख, पद्य पुरस्कार समितीचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी कर्णीक साहेबांच्या सहा दशकांच्या लोकोत्तर अतुलनीय सामाजिक कार्याची योग्य दखल घेऊन पद्य पुरस्कारासाठी प्राधान्याने केंद्रशासनाला शिफारस करावी अशी मागणी त्यांनी केली आहे. मा. कर्णिक साहेबांना पद्मद्य पुरस्कार मिळणे हा राज्यातील १७ लक्ष सरकारी कर्मचाऱ्यांचा बहुमान ठरेल असेही श्री. दौंड यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *