
| पुणे | कोरोनामुळे मार्च महिन्यापासून रखडलेली ग्रामपंचायतींची प्रभाग रचना येत्या २७ ऑक्टोबरपर्यंत अंतिम करण्याचा आदेश राज्य निवडणूक आयोगाने मंगळवारी राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना पत्राद्वारे दिला. त्यामुळे ग्रामपंचायतींची प्रभाग रचना आठवडाभरात अंतिम होऊ शकणार आहे.
कोरोनामुळे पंचवार्षिक निवडणुकांना स्थगिती मिळालेल्या ग्रामपंचायतींच्या निवडणुका या वर्षअखेरीपर्यंत (३१ डिसेंबरपर्यंत) किंवा नव्या वर्षात (जानेवारी २०२१) मध्ये होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या वृत्ताला जिल्हाधिकारी कार्यालयानेही दुजोरा दिला आहे.
मार्च ते ३१ ऑगस्ट या कालावधीत अनेक ग्रामपंचायतींचा कार्यकाळ संपला आहे. यानुसार १ जानेवारी २०२० या तारखेपर्यंतच्या मतदार याद्यांच्या आधारे गावनिहाय ग्रामपंचायतींची प्रभाग रचना निर्मिती प्रक्रिया सुरू केली होती. मात्र कोरोनाचा संसर्ग वाढत गेल्याने, 24 मार्चपासून लॉकडाउन सुरू जाहीर केला. परिणामी ही प्रक्रिया थांबविली होती.
कोरोनामुळे निवडणूक स्थगित झालेल्या ग्रामपंचायतींवर प्रशासक नियुक्ती केली आहे. त्यामुळे बऱ्याच ग्रामपंचायतींचे कामकाज प्रशासक पाहत आहे.
- आधी संपलेला पक्ष अशी टीका, आता युतीसाठी विनवण्या – एकनाथ शिंदे
एकनाथ शिंदे यांची उद्धव ठाकरेंवर बोचरी टीका - जळगावात तरुणीची अत्याचार करून हत्या
- तिहेरी हत्याकांडाने हादरला रायगड जिल्हा…एकाच कुटुंबातील तिघांची निर्घृण हत्या
7 महिन्याच्या गर्भवती महिलेच्या हत्येने हुतात्म्यांची भूमी सुन्न.. - महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना ठाणे महापालिका जिल्हा कार्यकारिणी स्थापन
राज्य कोषाध्यक्ष श्री अरुण बडे आणि ठाणे जिल्ह्या अध्यक्ष अरुण कराळे यांच्या निरीक्षणात पार पडली सभा - मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील सी.सी टीव्हीसाठीचे मध्यवर्ती शाळा नियंत्रण कक्षाचे दूरदूरश्यप्रणालीद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण संपन्न
*मिरा-भाईंदर महानगरपालिकेचे अनुकरण इतर महानगरपालिकांनीही करावे – मुख्यमंत्री