वाचाच : या साठी आता फास्ट टॅग प्रत्येक वाहनावर लावावा लागेल..!

| नवी दिल्ली | राज्यातील काही ठिकाणी टोल नाकेच नाहीत. आपली वाहने शहराच्या किंवा पंचक्रोशीच्या बाहेर जात नाहीत, यामुळे ‘फास्टॅग’ कशासाठी असा विचार करणारे बरेच आहेत. त्यांच्यासाठी ही महत्वाची बातमी आहे.

देशभरातील टोल नाक्यांवर वेळ वाचविण्यासाठी ‘फास्टॅग’ प्रणाली वर्षभरापूर्वीपासून बंधनकारक करण्यात आली होती. मात्र, एकाचवेळी एवढे ‘फास्टॅग’ मिळविणे आणि त्या प्रणालीतील दोष पाहून सरकारने ही मुदत काहीवेळा वाढविली होती. आता १ जानेवारीपासून ‘फास्टॅग’ बंधनकारक करण्यात आला आहे. यामुळे ‘फास्टॅग’ आत प्रत्येक वाहनाला लावावा लागणार आहे. तरीही राज्यातील काही ठिकाणी टोल नाकेच नाहीत. आपली वाहने शहराच्या किंवा पंचक्रोशीच्या बाहेर जात नाहीत, यामुळे ‘फास्टॅग’ कशासाठी असा विचार करणारे बरेच आहेत. त्यांच्यासाठी ही महत्वाची बातमी आहे.

तुमच्या वाहनाला ‘फास्टॅग’ नसेल तर तुम्हाला थर्ड पार्टी विमाही काढता येणार नाहीय. एप्रिल, 2021 पासून हा नियम लागू होणार आहे. याची माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने दिली आहे. जानेवारीपासून ‘फास्टॅग’ लावणे बंधनकारक करण्यात आले आहे. यामुळे जुन्या गाड्यांनाही ‘फास्टॅग’ लावावा लागणार आहे. 2017 पासूनच्या वाहनांना ‘फास्टॅग’ अनिवार्य होते.

आरटीओ रजिस्ट्रेशनवेळी ‘फास्टॅग’चा नंबर द्यावा लागत होता. 2017 आधीच्या वाहनांना फास्टॅग नव्हता. यामुळे ही वाहने आजही ‘फास्टॅग’शिवाय धावत आहेत. ‘फास्टॅग’ खरेदी करण्यासाठी ड्रायव्हिंग लायसनची फोटो कॉपी, वाहनाचे आरसी बुक लागणार आहे. फोटो आयडीसाठी आधार कार्ड, पासपोर्ट किंवा पॅनकार्ड द्यावे लागणार आहे. एनएचएआयनुसार तुम्ही ‘फास्टॅग’ कोणत्याही बँकेकडून खरेदी करू शकतात. यासाठी 200 रुपये घेतले जातात. फास्टॅगवर कमीत कमी 100 रुपये रिचार्ज करता येणार आहे. सरकारने बँक आणि पेमेंट वॉलेटमधून रिचार्ज करण्यासाठी अतिरिक्त चार्ज लावण्यासाठी सूट दिलेली आहे. एसबीआय, एचडीएफसी, आयसीआयसीआय, बँक ऑफ बडोदा, अ‍ॅक्सिस, सिटी युनियन बँकसारख्या बँका ‘फास्टॅग’ विकत आहेत.

याशिवाय फास्टॅग एनएचएआय च्या सर्व टोल प्लाझा, पेटीएम, ईकॉमर्स वेबसाईटवटवरही उपलब्ध आहे. ऑनलाईन टॅग खरेदी करण्यासाठी माय फास्टॅग अ‍ॅपदेखील उपलब्ध आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *