अनंत सुमन किशनराव रॅपनवाड नावासारखंच एक अनंत व्यक्तिमत्व..!
समाजभान जागृत असलेला समाजसेवक..! जबाबदार लोकप्रतिनिधी…! पुणे विद्यापीठाचा मानसशास्त्राचा पदवीधर…! कर्तृत्वाची शिखरे काबीज केलेला एक अवलिया..!
माझी ओळख झाली ती पुण्यात डी एड कॉलेज ला… त्याला पहिल्यांदा पाहिलं आणि वाटलं की चुकून जवळच्या MIT विद्यापीठातील विद्यार्थी आपल्या कॉलेज मध्ये आला की काय..! इतकी त्याची स्टाईल स्टेटमेंट जबरदस्त होती..! तिथून पुढे मग आमची दोस्ती वाढतच गेली आणि अनंतच्या व्यक्तिमत्वाचे एक एक पैलू उलगडत गेले आणि मी त्याचा फॅन होत गेलो..
जितक स्टँडर्ड आणि ब्रँडेड तो राहतो तितकेच स्टँडर्ड त्याचे विचार देखील आहेत हे हळूहळू कळत गेलं.. एरवी कुणी अरेरावी केली तर त्याला त्याच्याच भाषेत उत्तर द्यायला समर्थ असलेला आमचा अंतू… आई आणि वडीलांसमोर मात्र कधी नजर वर करून बोलला नाही… त्याचे आई वडील देखील तसेच आदर्शवत. वडील अगदी समाजशील आणि समाजात मान असलेलं व्यक्तिमत्व. अनंत ला सामाजिक जाणिवेच भान त्याच्या वडिलांकडून मिळालं आणि त्याने त्यात भर घालत समाजसेवक म्हणून देखील नाव कमावलं. डी एड पूर्ण झाल्यानंतर शिक्षकाची नोकरी सहज मिळत असताना देखील त्याने पुणे विद्यापीठात मानसशास्त्र अभ्यास केला आणि त्यात एम.ए. ची पदवी मिळवली आणि नोकरी न करता समाजासाठी काम करण्यावर भर दिला.
राजकारण तर घरात आधीपासून होतच त्यात मग तो नगरसेवक झाला आणि त्या माध्यमातून समाजसेवेची कामे करू लागला. त्याच्या या कार्याची दखल अनेक स्वयंसेवी संस्था आणि संघटनांनी घेतली. एक्का फाउंडेशन चा राज्यस्तरीय युवा चेतना पुरस्कार, समाजभान चा राज्यस्तरीय जाणीव पुरस्कार असे अनेक सन्मान त्याला मिळत गेले. आजही समाजासाठी काहीतरी सकारात्मक आणि विधायक काम करण्यात तो सतत गुंतलेला असतो. दवाखान्यातील रुग्णांना फळे व सकस आहार वाटप, गरजू लोकांना शासकीय योजनांचा लाभ मिळावा यासाठी विविध प्रकारची मदत , रक्तदान शिबिरे यांचं आयोजन नियमित स्वरूपात घेत असतो.
सध्या जगभर थैमान घालत असलेल्या कोरोना आजाराच्या काळात देखील गरजू लोकांना अन्नधान्य वाटप…गावी परतू इच्छिणाऱ्या कामगार लोकांसाठी वाहनांची व्यवस्था.. रक्तदान शिबिर अशी कामे करण्यात तो अग्रेसर आहे. अशा या बहुआयामी व्यक्तिमत्वाचा आज जन्मदिवस..!
दैनिक लोकशक्ती कडून शुभेच्छा..!
– प्रविण काळे, रायगड
- जळगावात तरुणीची अत्याचार करून हत्या
- तिहेरी हत्याकांडाने हादरला रायगड जिल्हा…एकाच कुटुंबातील तिघांची निर्घृण हत्या
7 महिन्याच्या गर्भवती महिलेच्या हत्येने हुतात्म्यांची भूमी सुन्न.. - महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना ठाणे महापालिका जिल्हा कार्यकारिणी स्थापन
राज्य कोषाध्यक्ष श्री अरुण बडे आणि ठाणे जिल्ह्या अध्यक्ष अरुण कराळे यांच्या निरीक्षणात पार पडली सभा - मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील सी.सी टीव्हीसाठीचे मध्यवर्ती शाळा नियंत्रण कक्षाचे दूरदूरश्यप्रणालीद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण संपन्न
*मिरा-भाईंदर महानगरपालिकेचे अनुकरण इतर महानगरपालिकांनीही करावे – मुख्यमंत्री - कार्यसम्राट दमदार आमदार महेंद्रशेठ थोरवे ६०००० च्या मताधिक्याने विधानसभेवर जाणार…पालकमंत्री उदयजी सामंत यांचे प्रतिपादन .
महाआघाडी सह मनसेलाही खिंडार…आमदार थोरवेंचा जलवा कायम .