विराटसेनेचा लाजिरवाणा खेळ, अवघ्या ३६ धावत गडगडला दुसरा डाव..

| क्रीडा प्रतिनिधी | पहिल्या कसोटी सामन्यातील दुसऱ्या डावांत भारतीय संघाची अवस्था दयनीय झाली आहे. पहिल्या डावांत ५३ धावांची आघाडी घेणाऱ्या भारतीय संघाची फलंदाजी पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळली. दुसऱ्या दिवसाअखेरीस १ बाद ९ वर डाव संपवलेल्या भारताकडे ६२ धावांची आघाडी होती. मात्र तिसऱ्या दिवसाच्या खेळात कांगारुंच्या वेगवान माऱ्यासमोर भारतीय फलंदाजांची दयनीय अवस्था झाली.

दुसऱ्या दिवशी भारतीय संघानं २९ धावांत ८ फलंदाज गमावले. यामध्ये मयांक अग्रवाल, विराट कोहली, पुजारा, रहाणे आणि साहा यांचाही समावेश होता. दुसऱ्या डावांत भारतीय संघ ९ गड्यांच्या मोबदल्यात ३६ धावांपर्यंत मजल मारली. लाजिरवाणी बाब म्हणजे एकाही भारतीय फलंदाजाला दुहेरी धावसंख्या उभारता आली नाही. भारतीय कसोटी क्रिकेटच्या इतिहासात असं पहिल्यांदच झालं आहे.

तिसऱ्या दिवसाच्या सुरुवातीपासूनच भारतीय संघ ढेपाळताना दिसला. दुसऱ्या डावात संघाने अत्यंत वाईट कामगिरी केली. यादरम्यान फलंदाज मोहम्मद शमी धाव करून दुखापतग्रस्त झाल्याने भारताने आपला डाव ३६ धावांवरच घोषित केला. त्यामुळे आता ऑस्ट्रेलिया संघाला विजयासाठी ९० धावा करायच्या आहेत. भारताकडून पृथ्वी शॉ (४), मयांक (९), बुमराह (२), पुजारा (०), कोहली (४), रहाणे (०), विहारी (८), साहा (४), अश्विन (०), उमेश यादव (४ नाबाद) आणि शमी (१) यांना दुहेरी धावसंख्या उभारता आली नाही.

पॅट कमिन्स, जोश हेजलवूड या दुकलीने भारतीय संघाला खिंडार पाडत संघाची अवस्था दयनीय केली. दुसऱ्या डावात भारतीय संघ फक्त ३६ धावांपर्यंत मजल मारु शकला. भारतीय संघाची ही निच्चांकी धावसंख्या ठरली आहे. कांगारुंकडून जोश हेजलवूडने ५ तर पॅट कमिन्सने ४ बळी घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *