संकटाच्या वेळेस धावून जाणारा, मानवतावादाची ज्योत तनात, मनात व जीवनात सतत जोपासणारे नेतृत्व म्हणजेच, आमदार सावंत सर…!
पावसाळ्याचे दिवस, 2019 साल, महाभयानक पावसान महाराष्ट्रा थैमान घातलं होतं. सगळीकडे हाहाकार माजला होता सरांच्या मतदारसंघात कोल्हापूर, सांगली, सातारा या जिल्ह्यांमध्ये महापुराचा तडाखा बसला होता. सारख्या बातम्या येत होत्या सांगली बुडाली, कोल्हापुरात प्रचंड पाऊस, साताऱ्यामध्ये पावसाची प्रचंड झेप. हे सगळं अस्वस्थ करणारे होतं आणि या सगळ्या गदारोळा मध्ये एक मन अस्वस्थ होतं ते मन म्हणजे आपल्या तुमच्या आमच्या सर्व शिक्षकांचे नेतृत्व आमदार सावंत साहेब यांचं मन.
कोणीतरी विचारवंतांनी म्हटल्याप्रमाणे, जी माणसं दुसर्याच्या चेहऱ्यावर आनंद निर्माण करण्याची क्षमता ठेवतात. ईश्वर त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद कधीच कमी होऊ देत नाही आणि म्हणूनच ती समाधानी असतात..
आमदार साहेब रोजच्या रोज फोन करत होते, स्वतःची कुटुंबीयांची काळजी घ्या असं सांगत होते. फोनवरून चौकशी करत होते शाळेचा काही नुकसान झाले का? आपले विद्यार्थी सुरक्षित आहेत का? प्रत्येक जण विद्यार्थ्याला व आपल्याला व आपल्या कुटुंबियांना जपा. त्यांची काळजी घ्या, आलेली वेळ नक्कीच टळून जाईल.
पण त्याच वेळेस काही आमच्या शिक्षक बांधवांचे फोन येत होते, सर शाळा पाण्यात बुडाल्या. ज्या जागेवर शाळा होत्या त्या शाळेच्या वरून पाणी वाहत आहे. सर शाळेतल्या विद्यार्थ्यांसाठी, शिक्षकांसाठी, शाळेसाठी काही मदत करता येते का बघा? हे सगळं ऐकून सरांच मन अस्वस्थ होत होतं. त्याचवेळीस राज्याच्या सर्वोच्च सभागृहाचा सदस्य या नात्याने सरांनी राज्य शासनाला काहीना काही मदत या पूरग्रस्त शाळांना केली पाहिजे अशी सक्षम भूमिका मांडण्याचा प्रयत्न केला. पाठपुरावा चालू होता.
एका बाजूने शासनाकडे पाठपुरावा करत असताना सरांच्या मतदारसंघात असणारे पुणे व सोलापूर हे जिल्हे मात्र सुदैवानं पूर बाधित नव्हते. सोलापुरातल्या काही मोजक्या शाळांना या पुराचा फटका बसला होता. सरांनी, पुणे जिल्ह्यातील आपल्या जीवाभावाच्या सहकाऱ्यांची बैठक लावली आणि हा विषय बैठकीमध्ये चर्चेला घेतला. पुणे जिल्ह्याचे महाराष्ट्र राज्य शाळा कृती समितीचे शिलेदार या सर्वांनी मिळून प्रत्येक पूर बाधित शाळेला मदत करावयाची भूमिका मांडली आणि सुरु झाला मदतीचा जागर आणि हे सर्व घडत होते आपले प्रेरणास्थान आदरणीय सावंत सर यांच्या प्रेरणेने..
पुणे जिल्ह्याबरोबरच सोलापूर जिल्हा सुद्धा यामध्ये मागे राहिला नाही सोलापूर जिल्ह्यातल्या सर्व महाराष्ट्र राज्य शाळा कृती समितीचे सर्व शिलेदार सरांच्या हाकेला ओ देऊन आपल्यापरीने मदत करण्याचे जाहीर केले. माझ्या मतदारसंघातील शिक्षक व शिक्षकेतर बांधव सुखी असलेच पाहिजेत, परंतु विद्यार्थ्यावर आलेले संकट या संकटावर मात करण्याची ताकद माझ्यामध्ये माझ्या सहकार्यांमध्ये नक्कीच आहे. माझ्या मतदारसंघातील प्रत्येक विद्यार्थी परत शाळेला आला पाहिजे, या भूमिकेतून सुरू केलेला हा मदतीचा जागर..
सर्व प्रकारच्या शालेय मदतीला समाजातील अनेक दानशूर व्यक्तीने सुद्धा हातभार लावला. कोणाचेही पैसे नकोत पण शाळेसाठी लागणारी वही, पेन, पेन्सिल, खोडरबर, खडू, डस्टर फाइल्स, पाण्याच्या बॉटल, शालेय दप्तर, स्वच्छते साठी लागणारे साहित्य असं साहित्य बघता बघता गोळा होऊ लागले.
“देणाऱ्याचे हात हजारो, दुबळी माझी झोळी,” या संत वचनाप्रमाणे सरांच्या मदतीची झोळी भरू लागली.
बघता बघता चाळीस लाखाचे शैक्षणिक साहित्य जमा झाले. पूर बाधीत शाळांचा अहवाल मागवून ३०० शाळांना समान पॅकेज तयार करून ते शाळेपर्यंत पोहोचेपर्यंत आमदार साहेब शांत बसले नाहीत. जरी मध्ये आधी त्यांना मुंबईला बैठकीला जावं लागलं तरीसुद्धा तिथून रोजच्या रोज संध्याकाळी सरांचे फोन यायचे, काही अडचण आहे का? काही कमी-जास्त पडते का? अशी सर्व चौकशी झाल्यानंतरच सर विश्रांतीला निघायचे .
सर, खरोखरच जोड नाही तुमच्या कार्य आणि कर्तुत्वाला, परिश्रमाला तोड नाही, जिद्दीला जोड नाही, कर्तुत्वाला सीमा नाही, नेतृत्वाला तोड नाही..म्हणूनच, सर आम्हाला अभिमान वाटतो की आम्ही तुमच्या सावलीखाली निश्चिंत आहे.
शिक्षक आमदार झाल्यानंतर आपल्या मतदारसंघातील प्राध्यापक, मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांचे प्रश्न आपण सोडवण्यासाठी प्रयत्न करीत असतात त्याच बरोबर माझ्या मतदारसंघातील विद्यार्थीसुद्धा सुखी राहिला पाहिजे हा प्रयत्न करणारा विचार जगापेक्षा निश्चितच वेगळा आहे असे मला वाटते. त्याचबरोबर २०१९ मध्ये covid-19 साथ आली असताना… सगळ्या जगामध्ये हाहाकार उठला… जगावर आलेलं महाभयंकर संकट या संकटा विरुद्ध लढण्यासाठी भारत देशामध्ये मोठ्या प्रमाणात लॉक डाऊन बसवण्यात आला… मार्च २०२० मध्ये अचानक शाळा बंद करण्यात आल्या… घराबाहेर पडू नका अशा सूचना शासनातर्फे देण्यात आल्या… आमचे विनाअनुदानित बांधव जागोजागी शाळेच्या गावात अडकले होते… सगळीकडेच वाईट अवस्था होती… एक तर पगार नाही… वरून शासनाचे आदेश घराबाहेर पडायचं नाही… विनाअनुदानित शिक्षकांची अवस्था इकडे आड तिकडे विहीर अशी वाईट झाली होती… घरामध्ये खायचे काय?
असा प्रश्न अनेक विना अनुदानित शिक्षकांच्या बाबतीमध्ये आ वासून उभा होता… आपल्या पुणे विभागातील शिक्षकांसाठी फुल ना फुलाची पाकळी म्हणून सरांनी रेशन पोचवण्याचा प्रयत्न केला… आपल्या पुणे विभागातील तालुक्या-तालुक्यातील महाराष्ट्र राज्य शाळा कृती समितीच्या शिलेदार यांना फोन करून… रेशन पोचवण्याची जबाबदारी माननीय सावंत सर यांनी घेतली… जवळजवळ वीस लाख रुपयाचे रेशन पुणे विभागातील पगार नसलेल्या शेकडो शिक्षक बांधवांना घरपोच करण्यात आले… असा अनमोल आणि संवेदनशील आमदार आपल्याला लाभलेला आहे..
त्याच बरोबर या covid-19 महाभयानक संकटामध्येज्या ज्या वेळेस रक्ताचा पुरवठा कमी झालेला आहे… त्या त्या वेळेस सोलापूर जिल्ह्यामध्ये सावंत सर तुमच्या प्रेरणेतूनच जवळ जवळ अडीच हजार रक्तदात्यांनी रक्तदान करून… हजारो लोकांना जीवनदान मिळवून दिले… त्यामध्ये आपण आमदार असताना स्वतः दोन वेळा रक्तदान केले हेही महत्वाच आहे… त्याच बरोबर आपण आपले कुटुंबीय यांनीही या चळवळीमध्ये सक्रिय सहभाग नोंदवून राष्ट्रीय कार्याला हातभार लावलेला आहे…” जिथे कमी तिथे आम्ही”… या वाक्याचा पुरेपूर विश्वास आपल्या कार्यातून आम्हाला नेहमी दिसतो…
या तुमच्या काम करण्याच्या चिकाटीला माझा व माझ्या सारख्या तमाम शिक्षक बांधवांचा सलाम आणि सलाम आहे.
शेवटी आमदार साहेब तुमच्यासाठी एवढेच म्हणेन,
“ज्याला शब्दांमधील आर्तता कळते ,
माणसा माणसातला संवाद कळतो.
ज्याला सामाजिकतेचे भान आहे,
अन माणुसकीवर ज्याचा विश्वास आहे
स्वतःपेक्षा इतरांसाठी जगण्यातला आनंद कळतो, आशा एका दिलदार अभ्यासू व्यक्तिमत्वास सर्व शिक्षक बंधू भगिनींनेंचे वंदन..!
– राजेश पवार, सहशिक्षक, शेळवे कृषी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय शेळवे..
- जळगावात तरुणीची अत्याचार करून हत्या
- तिहेरी हत्याकांडाने हादरला रायगड जिल्हा…एकाच कुटुंबातील तिघांची निर्घृण हत्या
7 महिन्याच्या गर्भवती महिलेच्या हत्येने हुतात्म्यांची भूमी सुन्न.. - महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना ठाणे महापालिका जिल्हा कार्यकारिणी स्थापन
राज्य कोषाध्यक्ष श्री अरुण बडे आणि ठाणे जिल्ह्या अध्यक्ष अरुण कराळे यांच्या निरीक्षणात पार पडली सभा - मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील सी.सी टीव्हीसाठीचे मध्यवर्ती शाळा नियंत्रण कक्षाचे दूरदूरश्यप्रणालीद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण संपन्न
*मिरा-भाईंदर महानगरपालिकेचे अनुकरण इतर महानगरपालिकांनीही करावे – मुख्यमंत्री - कार्यसम्राट दमदार आमदार महेंद्रशेठ थोरवे ६०००० च्या मताधिक्याने विधानसभेवर जाणार…पालकमंत्री उदयजी सामंत यांचे प्रतिपादन .
महाआघाडी सह मनसेलाही खिंडार…आमदार थोरवेंचा जलवा कायम .