शिक्षकांनी नक्की करावे काय.? एकीकडे कोरोना संबंधित कामे तर आता ऑनलाईन अध्यापन व नोंदणीचा देखील नवा भार..!

| मुंबई | शाळा प्रत्यक्ष सुरू होण्याबाबत अद्यापही अनिश्चितता असून ऑनलाइन वर्गाचाच पर्याय सध्या समोर आहे. शिक्षकांना त्यांच्या ऑनलाइन अध्यापनाचा आढावा सादर करणे शिक्षण विभागाने बंधनकारक केले आहे. मात्र, सध्या घरोघरी सर्वेक्षणात गुंतलेल्या शिक्षकांना ऑनलाइन वर्ग कधी घ्यावेत आणि अहवाल कसा द्यावा असा प्रश्न पडला आहे.

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे अद्याप शैक्षणिक वर्ष सुरू झाले असले तरी प्रत्यक्षात शाळा भरलेल्या नाहीत. ऑनलाइन माध्यमातून विद्यार्थ्यांचे शिक्षण सुरू आहे. शिक्षक कोणते माध्यम वापरतात याचा आढावा शिक्षण विभाग घेत असून त्यासाठी शिक्षकांना दर आठवड्याला ऑनलाइन वर्गाचा आढावा देणे बंधनकारक करण्यात आले आहे. राज्य शैक्षणिक संशोधन व परिषदेच्या (एससीईआरटी) संकेतस्थळावर शिक्षकांनी ही माहिती भरायची आहे. ‘शासन परिपत्रकाचा नीट अभ्यास करून त्यानुसार नोंद ठेवण्यात यावी. कोणतीही हयगय करू नये,’ असे संदेश अधिका-यांनी शिक्षकांना पाठवले आहेत.

नक्की काय काय करावे ,याबाबत शिक्षक वर्ग संभ्रमित असून वैतागलेला दिसून येत आहे. दिवसभर माझे कुटुंब माझी जबाबदारी याचे काम करायचे आणि त्यात आता या ऑनलाईन नोंदीची भर, त्यामुळे शिक्षकांमध्ये कमालीची अस्वस्थता दिसून येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *