शिक्षक पतसंस्थेमार्फत DCPS धारक सभासदांस २२ लाखांचे संरक्षक कवच, जुनी पेन्शन हक्क संघटनेच्या मागणीला यश..!

| जालना | जालना-बदनापूर शिक्षक पतसंस्थेने जुनी पेन्शन हक्क संघटनेच्या मागणीस अनुकूल प्रतिसाद देत DCPS धारक सभासदांना १० लक्ष विमा संरक्षण सहित एकूण २२ लक्ष रुपयांचे संरक्षक कवच प्रदान करण्याचा निर्णय घेतला आहे.जालना तालुका शिक्षक पतसंस्थेने सदैव शिक्षक सभासदांच्या हिताचे निर्णय घेतले आहेत त्यातच डिसीपीएस धारक बांधव यांना जुनी पेन्शन बंद झाल्याने त्यांचे भविष्य अंधकारमय आहे आणि या सर्व बाबींचा विचार करून संचालक मंडळाने एकमुखाने घेतलेल्या या निर्णयानुसार सभासद कल्याण योजना, विमा संरक्षण आणि कर्जमुक्ती योजनेअंतर्गत मिळून DCPS धारक सभासदांस २२ लक्ष रुपयांचे संरक्षक कवच उपलब्ध होणार आहे.

शिक्षक पतसंस्थेचे चेअरमन श्री. मंगेश जैवाळ, व्हा. चेअरमन श्री. संतोष कुमफळे, सचिव श्री.शिवाजी बांदल, संचालक सर्वश्री शिवाजी उगले, बबन बोरुडे, अशोक उबाळे, जगत घुगे, विकास पोथरे, शांतीलाल गोरे, परमेश्वर मोरे, अरूण जाधव, जगन्नाथ शिंदे, प्रशांत आष्टीकर, संचालिका श्रीमती कल्पना खंडागळे, श्रीमती सुरेखा आंधळे आदींचे जुनी पेन्शन हक्क संघटनच्या वतीने आभार व्यक्त करण्यात येत आहेत .

✓ DCPS धारक व त्यांच्या कुटुंबियांना सुरक्षितता देण्याचा प्रयत्न :
२००५ नंतर शासकीय सेवेत रुजू कर्मचाऱ्यांना आज जुनी पेन्शन योजना लागू नाही परंतु दुर्दैवाने एखाद्या शिक्षक बांधव मयत झाल्यास त्याच्या कुटुंबाची वाताहात होऊ नये व सुरक्षितता निर्माण व्हावी या उद्देशाने हा निर्णय सर्व संचालक मंडळाने घेतला आहे.
– श्री मंगेश जैवाळ चेअरमन,जालना तालुका शिक्षक पतसंस्था, म. जालना

✓ निर्णयाचे स्वागत :
आदरणीय चेअरमन ,सचिव व सर्व संचालक मंडळाने डिसीपीएस धारक सभासदांना व त्यांच्या कुटूंबियांना आधार देण्यासाठी जो सभासद कल्याण योजना ,विमा संरक्षण,आणि कर्जमुक्ती योजने अंतर्गत जे २२ लक्ष रुपयांचे सरंक्षण कवच प्रदान करण्याचा निर्णय घेतला आहे त्याचे आम्ही डिसीपीएस धारक जुनी पेन्शन हक्क संघटन तर्फे स्वागत करतो.
– संतोष देशपांडे, प्रसिध्दी प्रमुख, महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *